आडिवरेत झाले तावडे अतिथी भवन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

रत्नागिरी - सुमारे सव्वालाख जांभा चिरा वापरून १२ हजार चौरस फुटांवर बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्‌घाटन १० मे ला होणार आहे. तावडे यांची ऐतिहासिक, लढवय्या असा परिचय देणारी व आडिवरे या मूळ गावी आणि जगभरात विखुरलेल्या तावडे मंडळींना एकत्र आणणारी ही वास्तू आहे. आगामी काळात पर्यटनासह, विविध समारंभांसाठी हे भवन खुले होणार आहे.

माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत याचे उद्‌घाटन होणार आहे. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचा अमृतमहोत्सव व वधू -वर सूचक मंडळाचा सुवर्ण महोत्सव यासह अतिथी भवनाचे उद्‌घाटन असा हा त्रिवेणी संगम आहे. 

वास्तूचा आराखडा आखला. राजपुताना शैली, मंगलोरी कौले व तावडे यांची ऐतिहासिक परंपरा सांगणारी ही वास्तू संस्मरणीय आहे. कलाकुसर केलेल्या खिडक्‍या, झरोके यामुळे शान वाढली.
- संतोष तावडे,
आर्किटेक्‍ट

८०० वर्षांपूर्वी तावडे आडिवरे दशक्रोशीचे संस्थानिक होते. त्यानंतर ते जगाच्या विविध भागांत स्थिरावले. त्यामुळे मूळ गावी तावडे भवन असावे या हेतूने गेली अडीच वर्षे याचे काम सुरू होते. ५० गुंठे जागेमध्ये १२ हजार चौरस फुटांचा वाडा उभारला आहे. ही वास्तू सांस्कृतिक ठेवा आहे. येथे संस्कृतीशी संबंधित, सणवार साजरे केले जातील. सांकेतिक स्वरूपाचे देवस्थान, कम्युनिटी सेंटर, सांस्कृतिक केंद्र, कुलदेवतेचे स्थान अशी या वास्तूची ओळख होईल. वास्तूमध्ये सर्व सोयींनीयुक्त व आलिशान स्वरूपाचे आठ सूट्‌स आहेत. आवारात कुलध्वज, गार्डन, बेसमेंटला स्वयंपाकगृह आहे.

Web Title: Ratnagiri News Tavade Bhavan in Aadivare