तावडे भवन पर्यटनाचे केंद्र बनेल - मंत्री तावडे

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 10 मे 2018

रत्नागिरी - तावडे भवन पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र होईल, असा विश्‍वास शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

आडिवरे (ता. राजापूर) येथे तावडे अतिथी भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

तावडे कुलातील युवकांना उद्योजक होण्याकरिता मार्गदर्शन केंद्र तावडे मंडळाने चालू करावे. तावडेंनी नोकरी देणारे म्हणजे उद्योजक बनावे. युवा पिढीला मंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी उपक्रम आखावेत. तावडे भवनात दर दोन वर्षांनी आपण सर्वांनी भेटले पाहिजे. 

- विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री

खासदार राऊत यांनी हे तावडे भवन कोकणच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरेल, असे मत व्यक्त केले. संतोष तावडे यांनी तावडे व आडिवर्‍याचे नाते सांगितले.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, तावडे मंडळाचे काम मोठे आहे. संस्थेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही मंडळाचे वय वाढते तसे ते अनुभव संपन्न होते आणि कार्यक्षमता वाढते, ते चिरतरुण राहते.

वर्षा विनोद तावडे, माजी आमदार बाळ माने, उद्योजक सुरेश कदम, उल्का विश्वासराव, कुमार शेट्ये, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार शंकरराव तावडे, वास्तुविशारद व स्वागताध्यक्ष संतोष तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे, राजेंद्र तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष हरीश परब आदी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Tawade Bhavan Inauguration