रत्नागिरी जिल्ह्यात 23 कोटींच्या तीन पर्यटन जेटी 

राजेश शेळके
शुक्रवार, 20 जुलै 2018

रत्नागिरी - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मेरीटाईम बोर्डाच्या साह्याने पर्यटन वाढीचा वेगळा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुमारे 23 कोटींच्या नवीन तीन पर्यटन जेटी उभारण्यात येणार आहेत.

रत्नागिरी - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मेरीटाईम बोर्डाच्या साह्याने पर्यटन वाढीचा वेगळा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुमारे 23 कोटींच्या नवीन तीन पर्यटन जेटी उभारण्यात येणार आहेत. वॉटर स्पोर्टसह पर्यटकांना समुद्राची सफर घडवून आणणारा हा प्रकल्प आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. 

जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. पर्यटनस्थळांच्या मूलभूत सुविधांबरोबर देशी-विदेशी पर्यटक रत्नागिरीत खिळून राहण्यासाठी नवी संकल्पना मेरीटाईम बोर्डाची मदतीने आखण्यात आली आहे. गुहागर, वेलदूर, हर्णै (सुवर्णदुर्ग) या प्रसिद्ध समुद्रकिनार्‍यावर त्याची आखणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे वॉटरस्पोर्टसह समुद्र सफर, समुद्राच्या अंगातील वेगळे विश्‍व पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग आदी प्रयोग यशस्वी झाले. आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील किनारी हा प्रयोग होणार आहे.  किनार्‍यांवर पर्यटनासाठीच्या जेटींची कमतरता आहे. त्याचा अभ्यास करून तीन ठिकाणी नवीन जेटी बांधण्यासाठी 23 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. मंजुरीसाठी तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. 

असे आहेत प्रस्ताव

  • गुहागरसाठी 7 कोटी 62 लाख
  • वेलदूरसाठी 7 कोटी 65 लाख
  • हर्णैसाठी 7 कोटी 82 लाखाचा  

जिल्ह्यात पर्यटन वाढीला मोठी संधी आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी एमटीडीसी आणि मेरीटाईम बोर्डाने जिल्ह्यातील गुहागर, वेलदूर आणि हर्णै समुद्र किनारी पर्यटन जेटीचा प्रस्ताव दिला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

- श्री. मंजुळे,  मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी

Web Title: Ratnagiri News three Tourism Jetties in District