पर्यटन महोत्सव 29 एप्रिलपासून रत्नागिरीत

राजेश कळंबटे
शुक्रवार, 30 मार्च 2018

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपालिकेकडून 29, 30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यभरातील पर्यटकांनी येथे येऊन भगवतीची केव्ह, व्हॅलिक्रॉसिंग, बॅकवॉटरमध्ये बोटींग यासह स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घ्यावा म्हणून हा महोत्सव घेण्यात येत आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी दिली.

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपालिकेकडून 29, 30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यभरातील पर्यटकांनी येथे येऊन भगवतीची केव्ह, व्हॅलिक्रॉसिंग, बॅकवॉटरमध्ये बोटींग यासह स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घ्यावा म्हणून हा महोत्सव घेण्यात येत आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटन स्थळांची ओळख पटवून देतानाच पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ही संकल्पना गतवर्षीपासून राबविली जात आहे. गेल्यावर्षी तीन दिवसांच्या पर्यटन महोत्सवावेळी दहा हजार पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले होते. याची चाचपणीही आम्ही केली. यावर्षी 29 एप्रिलला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित राहतील. एक मे रोजी समारोप होणार असून या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र वायकर येणार आहेत. प्रमोद महाजन क्रीडांगणावर हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यात 29 एप्रिल रोजी सेलिब्रेटी असतील तर पुढील दोन दिवस स्थानिक कलाकृतींचे आयोजन केले आहे. त्यात नमन, खेळे, पालखी नृत्य, जाखडी यासारख्या कोकणी कलाकृतींचा समावेश असेल.

गतवर्षीप्रमाणे भाट्ये येथे रॅपलिंग, व्हॅलीक्रॉसींग, बॅकवॉटरमध्ये बोटींग यासह यावर्षी नव्याने स्कूबा डायव्हिंग सुरु झाले आहे. त्याचबरोबर जिजामाता उद्यान, बंदिवासात सावरकर राहिलेली कोठडी पाहण्याची संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी मुंबई, पुण्यातील टुर्स ऑपरेटस्ची चर्चा झाली आहे. पर्यटक रत्नागिरीत आल्यानंतर त्यांना आंबे खरेदीसाठी गोखले नाक्यात जाता यावे म्हणून ठिकठिकाणी पार्किंगचीही सुविधा दिली जाईल. मोठ्या शहरांमध्ये बॅनरद्वारे प्रसिध्दी केली जाणार आहे.

लहान मुलांसाठी टिळक आळी, सावरकर नाट्यगृह येथे फनी स्ट्रीट घेण्यात येणार आहे. नेहमी फिरणार्‍या रस्त्यावर सायकलिंग, जादूचे खेळ, टॅटू काढण्याचा उपक्रम घेतला जाईल. भगवतीबंदर येथील केव्हिंग हे या महोत्सवाच प्रमुख आकर्षण राहील. रत्नागिरी शहराची ओळख मँगो सिटी बनविण्याचा प्रयत्न आहे.

- राहूल पंंडित, नगराध्यक्ष

दरम्यान, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी जेथे व्यायाम केला अशा रत्नागिरीतील गाडीतळ येथील व्यायामशाळेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यावर 25 लाख रुपये खर्च केले आहे. त्याचे उद्घाटन उद्या (ता. 31) सायंकाळी 6 वाजता खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्या हस्ते होईल. याच ठिकाणी महिलांसाठीही वेगळी व्यायामशाळा सुरु केली आहे. यामध्ये व्यायाम करणार्‍यांना मोफत लाभ दिला जाणार असल्याचे श्री. पंडित यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri news Tourism Festival from 29 April