उन्हाच्या कडाक्यातही पर्यटक किनार्‍यांकडे

राजेश कळंबटे
गुरुवार, 3 मे 2018

रत्नागिरी - उन्हाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसत आहे; मात्र सुट्टीसाठी पर्यटकांचा राबता कोकणातील किनार्‍यावरच दिसतो. गणपतीपुळेला हजारो पर्यटक दिवसाला भेट देत आहेत. भर दुपारच्या उन्हात सुमद्रात फिरण्यासाठी बोटींपुढे पर्यटकांच्या रांगा दिसत आहेत. चार दिवसांमध्ये दररोज तीस हजार पर्यटक गणपतीपुळेत येऊ गेल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील पारा 35 ते 40 अंश सेल्सिअसमध्ये राहीला आहे. परिक्षा संपल्यानंतर मुलांच्या सुट्ट्याचे नियोजन सुरु झाले. कोल्हापूरसह मुंबई, पुणे, नागपुर, नाशिकसारख्या भागातील अनेक पर्यटकांची पावले कोकणात वळत आहे. गुहागर, दापोलीसह गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची गर्दी प्रचंड प्रमाणात आहे. श्री गणरायाचे दर्शन घेऊन पर्यटकांना समुद्रामध्ये मनसोक्त पोहण्याचा आंनद घ्यायला मिळतो.

समुद्रात फिरण्यासाठी बोटींग, जेट स्कीचा थरारही अनुभवता येतो. त्यामुळे पर्यटक आपसूकच गणपतीपुळेमध्ये थांबतात. गेल्या चार दिवसात पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर उन्हाचा रखरखाट वाढू लागतो. भर उन्हातही गणपतीपुळे किनार्‍यावर फिरणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक आहे.

स्वच्छ पाण्याचा तुटवडा

समुद्रामध्ये आंघोळ केल्यानंतर वाळू आणि खार्‍या पाण्याने अंगाला खाज सुटते. स्वच्छ पाण्याने आंघोळ करण्याशिवाय पर्याय नसतो. समुद्रातून आलेल्या या पर्यटकांना स्वच्छ पाण्यासाठी भटकावे लागत आहे. हॉटेलमध्ये निवासी असलेल्यांना हा प्रश्‍न उद्भवत नाही. एक दिवसाच्या टूरवर आलेल्यांची पंचाईत होत आहे.

श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर किनार्‍यावर फिरण्याची मजा औरच असते. त्यासाठी कोल्हापूरहून आम्ही आलो.

- प्रशांत लिंगायत, कोल्हापूर

Web Title: Ratnagiri News tourist on Beach