मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूण नजीक झाड कोसळले

मुझफ्फर खान
रविवार, 10 जून 2018

चिपळूण -  शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस काेसळत आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी आठच्या सुमारास मुंबई - गाेवा महामार्गावर वडाचे झाड काेसळले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास बंद हाेती.

झाड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी महसूलचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. स्थानिक नागरिक, महसूल कर्मचारी यांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने साडेनऊ वाजता झाड हटविले. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Ratnagiri News tree fall on Mumbai-Goa Highway near Chiplun