६ हजार वृक्ष वाचले; ९ हजारांचे पुनर्रोपण

राजेश कळंबटे
बुधवार, 12 जुलै 2017

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी कित्येक झाडांची कत्तल करावी लागणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास  होऊ नये आणि कमीत कमी झाडे तोडली जावीत यासाठी कोकण भवनमधील मुख्य अभियंत्यांनी झाडांचे फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार आरवली ते वाकेडदरम्यान फक्‍त चौपदरीकरणात अडथळा बनलेल्या ४० हजार झाडांच्या कत्तलीवर शिक्‍कामोर्तब झाले. जुन्या प्रस्तावातील सहा हजार झाडे वाचविण्यात आली आहे. तसेच नऊ हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात  येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. गणेशोत्सवानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे.  त्यापूर्वी आवश्‍यक त्या परवानग्या घेण्यात येणार आहेत. चौपदरीकरणासाठी आवश्‍यक जागेतील झाडे तोडूनच पुढील कामे करावी लागणार आहेत. माणगाव ते कुडाळ ३६६.१७ किमी मार्ग आहे. दहा टप्प्यांमध्ये याचे काम सुरु करण्यात येईल. यातील आरवली ते तळेकांटे ४० किमी परिसरातील १८ हजार ५७७ आणि तळेकांटे ते वाकेड या ५०.९० किमी अंतरातील २७ हजार ४०८ झाडे तोडावी लागणार असल्याचा अहवाल कंत्राटदाराने बांधकाम विभागाला दिला आहे. एकूण ४५ हजार ९८५ पैकी ३० हजार ९१४ झाडे जंगली असून १५ हजार ०७१ फळझाडे आहेत.

हा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु वरिष्ठांनी या झाडांचे फेरसर्व्हेक्षण करा असे आदेश दिले. रस्ता उभारण्यासाठी झाडे किती तोडली जाणार आहेत, त्याचा अहवाल मागविण्यात आला होता. पुन्हा झाडांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. नवीन अहवालात ४५ हजार ९८५ पैकी सहा हजार झाडे वाचली आहेत. उर्वरित झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी मुख्य अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वन विभागाने ठरवून दिलेली रक्‍कम कंत्राटदाराकडून जमा करून घेतली जाईल. त्यानंतर झाडे तोडण्याचे काम सुरू होईल. हा मार्ग ग्रीन हायवे म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे चौपदरीकरण झाल्यानंतर जेवढी झाडे तोडली जातील, तेवढी पुन्हा लावण्यात येणार आहेत. ते काम कंत्राटदारालाच करावे लागेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: ratnagiri news tree Transplantation