भटक्‍या विमुक्त जमाती आयोग कायमस्वरूपी करा - इदाते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

दाभोळ - देशात ५७१ विमुक्‍त जमाती, १ हजार भटक्‍या, २५ अर्धभटक्‍या जमाती आहेत. देशात कायमस्वरूपी भटक्‍या विमुक्‍त जमाती आयोगाची स्थापना करावी, महाराष्ट्राच्या धर्तीवर अन्य राज्यांमध्ये या जमातींसाठी संचालनालय व आर्थिक महामंडळ उभारावे आदी सूचना भटक्‍या विमुक्‍त जमाती आयोगाच्या अहवालात करण्यात आल्या आहेत.

आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे आपला अहवाल सुपूर्द केला. नवी दिल्लीच्या शास्त्री भवनात इदाते यांनी आयोगाचे सदस्य श्रवण सिंह, सदस्य सचिव बी. के. प्रसाद यांच्या उपस्थितीत अहवाल दिला. ९ जानेवारी २०१५ ला हा आयोग स्थापन झाला होता. अहवालात ३० सूचना व ८३ उपसूचना केल्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात भेटी देऊन आयोगाने तपशील गोळा केला. 

  •  देशात ५७१ विमुक्त जमाती
  •  १ हजार भटक्‍या, २५ अर्धभटक्‍या
  •  अहवालात ३० सूचना व ८३ उपसूचना

कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने या आयोगाची निर्मिती करून ३ वर्षांत अहवाल सादर करावा, असे म्हटले होते. मात्र, इतर आयोगांसारखी कोणतीही मुदतवाढ न घेता या आयोगाने आपला अहवाल वेळेत सादर केला आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

Web Title: Ratnagiri News Tribes Commission Dada Idate