रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात जखमी कासवाला तरुणांकडून जीवदान

कृष्णकांत साळगांवकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

रत्नागिरी - हर्णे बंदरात किनाऱ्यावर आलेल्या आलिव्ह रिडले जातीच्या जखमी कासवाला उपचार करून पुन्हा समुद्रातील पाण्यात सोडून देण्यात आले. हर्णेतील तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला.  

रत्नागिरी -  हर्णे बंदरात किनाऱ्यावर आलेल्या आलिव्ह रिडले जातीच्या जखमी कासवाला उपचार करून पुन्हा समुद्रातील पाण्यात सोडून देण्यात आले. हर्णेतील तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला.

मासेमारी जाळीत पाय अडकल्यामुळे हे कासव किनाऱ्यावर आले असण्याची शक्यता आहे. सुमारे 30 किलो वजनाचे हे कासव जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आले होते. समुद्राला ओहोटी असल्यामुळे ते किनाऱ्यावरील वाळूत निपचित पडले होते, मात्र समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या काही तरुणाचे लक्ष या जखमी कासवाकडे गेले. त्यांनी या कासवाच्या पायात अडकलेली जाळी काढून टाकली.  त्याच्यावर आैषध उपचार केले व पुन्हा समुद्रात सुखरूप सोडून दिले. समुद्रातील नैसर्गिक बदल व तुटलेली जाळी, प्लास्टिक कचऱ्यात अडकून वेळो वेळी आलिव्ह रिडले कासवांचा नाहक बळी जात असल्याने, दुर्मिळ अलिव्ह रिडले समुद्री कासवांचे जीवन धोक्यात आले आहे. आलिव्ह रिडले कासवांच्या बचावा करिता लोकांनी जागृतता दाखविणे गरजेचे आहे.

कासवे मच्छिमारी जाळ्यामध्ये अडकण्याचे प्रमाण अधिक आहे. जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे ती अर्धमेली होतात. अशा कासवांना पकडून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असते. उपचारा दरम्यान जखमा झाल्या आहेत का हे तपासून योग्यवेळीच त्यांना पुन्हा समुद्रात सोडावे लागते. उपचारानंतर ही कासवे वाचू शकतात. याबाबत आम्ही पर्यावरणप्रेमी जनजागृती मोहिम आयोजित करतो. पर्यटकही यामध्ये मोठ्या उत्सूकतेने सहभागी होतात, पण आपल्याकडे मच्छिमारीचे प्रमाण अधिक असल्याने या अपघातावर आळा आणणे अशक्य आहे. कासवावर योग्यवेळी उपचार झाले तर ही कासवे वाचू शकतात. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- भाऊ काटदरे,
पर्यावरण रक्षक

 

Web Title: Ratnagiri News Turtle saved by youngster