रत्नागिरीतील दोन नगरसेवक राणेंच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर लांजा, राजापूर, चिपळूणपाठोपाठ रत्नागिरीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आम्ही काँग्रेसमुक्‍त झालो, असे जाहीर केले. पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही राणेंच्या पाठीशी ठाम उभे आहोत. रत्नागिरीच्या विरोधी पक्षातील दोन नगरसेवक नारायण राणेंच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही राणे समर्थकांनी केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला काँग्रेस तालुका उपाध्यक्ष महादेव आखाडे, युवा तालुकाध्यक्ष मेहताब साखरकर, भाई भोळे, संकेत चवंडे, अशोक वाडेकर, माजी शहराध्यक्ष नित्यानंद दळवी यांच्यासह मंदार सनगरे, प्रवीण आडविलकर, नंदकिशोर चव्हाण, आनंद बारे, शिवाजी कारेकर, मुस्तकिन चंदावले, अमित देसाई, अभि कारेकर, रफिक मुकादम, बाळा देसाई, पिंट्या देसाई, राहुल भाटकर, सोनू रसाळ आदी उपस्थित होते.प्रदेशस्तरावरुन खेळल्या जाणाऱ्या कपटी राजकारणामुळे राणेंवर  अन्याय झाला आहे. त्यासाठीच आम्ही राजीनामा देत आहोत.

गेली चार वर्षे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍तीची मागणी राणे यांनी वरिष्ठांकडे केली होती; मात्र वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. हुस्नबानू खलिफे यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपविली जाण्याची शक्‍यता आहे. जे काम करत होते, त्यांच्यासाठी राणेंनी आग्रह धरला. पण ती मागणी मान्य केली नाही, असे श्री. वाडेकर यांनी सांगितले. राणे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. त्यांच्या मागे आम्ही उभे राहणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जुने राणे समर्थक अनुपस्थित
शिवसेनेतून काँग्रेस प्रवेशावेळी राणेंसोबत आलेल्या अनेक जुन्या समर्थकांची या पत्रकार परिषदेला अनुपस्थिती होती. त्यांच्याविषयी विचारले असता तेही राजीनामा देतील, असे उत्तर श्री. वाडेकर यांनी दिले. काँग्रेसमध्ये राहण्यास ते इच्छुक नसल्याचा दावा केला आहे. टप्प्याटप्प्याने राजीनामा देण्याच निर्णय घेण्यात येत असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

Web Title: ratnagiri news two Corporators in narayan rane"s touch