रत्नागिरी एसटी महामंडळाला गणेशोत्सव काळात दोन कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  यंदाचा गणेशोत्सव एसटी महामंडळाला लाभदायक ठरला आहे. महामंडळाकडून केलेल्या नियोजनामुळे एसटीच्या प्रवासी संख्येबरोबर उत्पन्नातही वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी एसटीचे उत्पन्न वाढून यावर्षी रत्नागिरी विभागाला २ कोटी १८ लाख ९४ हजार ११६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरातून राहणाऱ्या कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. सणानिमित्त बाहेरगावी राहणारे कोकणवासीय आपल्या गावी परतात. गावी येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडल्या जातात. यावर्षी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून १३३४ जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षी १३५२ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली; परंतु प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता यावे, यासाठी एसटीने मोबाईल आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाने विनाअपघात सेवा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. गतवर्षी रत्नागिरी विभागाला १ कोटी ९१ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी यामध्ये वाढ झाली असून २ कोटी १८ लाख ९४ हजार ११६ उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी गुहागर, चिपळूण, राजापूर या आगारांना सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. 

Web Title: ratnagiri news two crore benefit to state transport