मुंबईला फणस घेवून जाणारा ट्रक उलटून दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-शेलटीवाडी येथे वटपौर्णिमेसाठी कणकवलीहून मुंबईत फणस घेवून जाणारा ट्रक उलटून दोघे ठार, तर पाचजण जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात शनिवारी (ता. 23) रात्री झाला.

जयवंत कृष्णा बिडेय (वय 45) व देवेंद्र आत्माराम बिडये (वय 47, रा. बिड्येवाडी-नांदगाव, ता. कणकवली) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक अरविंद बिड्ये हे ट्रक (एमएच-07-एक्स-1790) हे वटपौर्णिमेसाठी मुंबईत फणसाची विक्री करण्यासाठी घेवून जात होते. त्यांच्यासोबत विठ्ठल विजय बिड्ये, राजेश बाळकृष्ण तांबे, लक्ष्मण नारायण बिड्ये, अश्‍विनी लक्ष्मण बिड्ये होते. रात्री ट्रक मुंबई-गोवा महामार्गावरील शेलटीवाडी-निवळी येथे आला असता चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारी उलटला. यामध्ये जयवंत बिड्ये व देवेंद्र बिड्ये जागीच ठार झाले. चालकासह पाचजण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Ratnagiri News two dead in accident in NIvali