फुणगुस खाडीत मुंबईचे दोघे बुडाले

संदेश सप्रे
रविवार, 13 मे 2018

संगमेश्वर - तालुक्यातील फुणगुस खाडी पात्रात पोहायला उतरलेल्या पाच पैकी २ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली.

संगमेश्वर - तालुक्यातील फुणगुस खाडी पात्रात पोहायला उतरलेल्या पाच पैकी २ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली.

प्रसन्न हेमंत रामपूरकर (वय वर्ष १६,) साहिल दिनेश सावर्डेकर (वय वर्ष १४ दोघेही रा. मुबंई) अशी मृतांची नावे आहेत. अथक प्रयत्नांनंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढण्यात यश आले. 

प्रसन्न आणि साहिल हे सुट्टीमध्ये गावी आले होते. आज रविवार असल्याने तसेच उन्हाचा कडाका जास्त असल्याने गावातील अन्य तीन साथीदाराना घेऊन ते खाडी पात्रात पोहण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोलात बुडु लागले. अन्य तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही. घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Web Title: Ratnagiri News two dead in Phudgur Sea

टॅग्स