शास्त्री नदीत भरतीच्या पाण्यात दोन मुली बुडाल्या

संदेश सप्रे
सोमवार, 28 मे 2018

संगमेश्वर - शास्त्री नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन सख्ख्या बहिणी भरतीच्या पाण्यात बुडाल्या. यातील एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर असून तिला रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी एकच्या दरम्यान घडली. 

या दुर्घटनेत पुर्वा विजय कांजिया (८) ही  मयत झाली असून जयश्री विजय कांजिया (१२) हिच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु आहेत. या दोघीही संगमेश्वर केंद्रशाळेच्या विद्यार्थिनी आहेत.
याबाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर परिसरात मसाला विक्रीचा व्यवसाय करणारे  विजय कांजिया आपल्या कुटुंबियांसह संगमेश्वर रामपेठ येथे राहतात. त्यांच्या 
पुर्वा आणि जयश्री या दोन मुली आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शास्त्री नदीत आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्या ज्या भागात उतरल्या तिथे एरव्ही पाणी कमी असते. ज्यावेळी त्या पाण्यात गेल्या त्यावेळी खाडीत भरती सुरु होती यामुळे अचानक पाणी वाढू लागले. याचा अंदाज न आल्याने दोघीही खोल पाण्यात वाहू लागल्या. मुलींचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या ग्रामस्थांनी पाण्यात उडी घेतली. पण तोपर्यंत पुर्वा खोल पाण्यात वाहून गेली तर जयश्री ग्रामस्थांच्या हाताला लागली. तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिला तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नंतर रत्नागिरीत हलविण्यात आले. 

Web Title: Ratnagiri News two Girls sink in Shasthri River