रत्नागिरीत दुचाकीने पेट्रोल पंपावरच घेतला पेट

अमोल कलये
बुधवार, 18 एप्रिल 2018

रत्नागिरी - शहरातील माळनाका येथेे असणाऱ्या गांधी पेट्रोल पंपात एका दुचाकीने पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाचा बंब लगेचच दाखल झाल्याने संभाव्य धोका टळला. 

रत्नागिरी - शहरातील माळनाका येथेे असणाऱ्या गांधी पेट्रोल पंपात एका दुचाकीने पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाचा बंब लगेचच दाखल झाल्याने संभाव्य धोका टळला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अरुण निकम हे पंपावर पेट्रोल भरुन बाहेर पडत होते. गाडी सुरू करताना स्पार्क झाला व गाडीने पेट घेतला. पंपावरील आग विरोधी उपकरणाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न तातडीने करण्यात आला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले. अखेर अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण या आगीत दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली. पंपातच दुचाकीली लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ या ठिकाणी उडाली.

Web Title: Ratnagiri News two wheeler burn on Petrol pump