हॅट्‌ट्रिकची स्वप्नं पाहू नयेत - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

रत्नागिरी - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडी घेतल्याचे विरोधकांनी चित्र उभे केले आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. जिल्ह्यात पत्रक वाटायला विरोधकांकडे माणसे नाहीत. जिल्ह्यात होणाऱ्या एकूण मतदानापैकी ८० टक्के मते शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या पारड्यात पडतील. पहिल्या फेरीतच मोरे निवडून येतील. हॅट्‌ट्रिकची स्वप्नं कोणी बघू नयेत, असा इशारा शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी दिला. 

खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते. 

पदवीधर निवडणुकीचा विचार करता यावेळी ७२ टक्के मतदान होईल. जिल्ह्यात एकूण १६ हजार २२२ मतदार आहेत. पैकी ८० टक्के शिवसेनेला होईल. सर्व शिवसैनिकांच्या जीवावर संजय मोरे येथून आघाडी घेतील. निकालादिवशी राजकीय खेळीची प्रचिती येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार ३०८ मतदार आहेत. तिथेही सेनेला चांगले मतदान होईल. रायगड जिल्ह्यात १९ हजार ९१८ मतदार आहेत. रायगडमध्ये अनेकांचा अतिविश्‍वास आहे. तेथे चांगलीच चुरस होईल.

संजय मोरे रायगडचे संपर्कप्रमुख होते. त्याचा फायदा होईल. ठाण्यामध्ये ४५ हजार ८३२ मतदार आहेत. श्री. मोरे यांनी महापौर, शिक्षण सभापती म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडुन आलेले निरंजन डावखरे भाजपमध्ये गेल्याने अनेक नाराज आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. मुल्ला यांच्याबद्दल रत्नागिरीतील काही इच्छुक नाराज आहेत. फार मोठे चित्र विरोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सामंत यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Uday Samant comment