मुंबई गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणातील अर्धवट पुलांचा प्रश्न ऐरणीवर

राजेश कळंबटे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणातील पुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भातील कारवाईचे आदेश दिले आहेत. खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही माहिन्यांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलांची कामे बंद आहेत. त्यामुळेच सध्या या अर्धवट पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण एक दोन नव्हे तर  रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील तब्बल 12 पुलांची कामे ठप्प आहेत. अंजणारी, वाशिष्ठि, जगबुडी, शास्त्री, वाकेड अशा बारा पुलांची कामे अर्धवट स्थितीच आहेत. ही कामे दोन वर्षात पुर्ण करायची होती. मात्र मुंदत संपून देखील ही कामे पुर्ण झाली नाहीत.

खासदार विनायक राऊत यांनी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे आता अर्धवट स्थितीत असलेल्या या पुलांबाबत ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. तशा कारवाई करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच ठेकेदाराकडून ठेका काढून नवीन ठेकेदार नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

Web Title: Ratnagiri News Vinayak Raut comment