रत्नागिरीतून दोन महिन्यांत ‘टेकऑफ’ - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - रत्नागिरीतून हवाई वाहतुकीची भरारी आता दूर नाही. तटरक्षक दलाच्या तळाचे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात दलाची विमाने येथे लॅंड होतील. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेऊन दोन महिन्यांत खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल. त्यामुळे रत्नागिरीकरांना हवाईसफर आता लांब नाही, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.

रत्नागिरी - रत्नागिरीतून हवाई वाहतुकीची भरारी आता दूर नाही. तटरक्षक दलाच्या तळाचे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात दलाची विमाने येथे लॅंड होतील. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेऊन दोन महिन्यांत खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल. त्यामुळे रत्नागिरीकरांना हवाईसफर आता लांब नाही, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला. पालिकेच्या ‘विचार मंथन २०१८’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

रत्नागिरी-मुंबई हवाई प्रवास काही वर्षांपूर्वी सुरू होता. खासगी विमान कंपन्यांच्या पुढाकारामुळे ते शक्‍य होत होते. तेव्हा एमआयडीसीच्या ताब्यात रत्नागिरी विमानतळ होता. मात्र आता विमानतळ तटरक्षक दलाने ताब्यात घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोकणातील मोठा तळ येथे उभारला जात आहे. या ठिकाणी विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी वाढविण्याची गरज होती. काही कोटी रुपये खर्च करून तटरक्षक दलाच्या या तळाचे विस्तारीकरण सुरू आहे. 

शासनाच्या उडाण योजनेतून रत्नागिरी विमानतळाच्या विस्ताराचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये दोन किलोमीटरची धावपट्टी, टर्मिनस बिल्डिंग आदी कामे पूर्णत्वाच्या मार्गाला आहे. मार्चअखेरपर्यंत विमान लॅंडिंग आणि टेकऑफची चाचणी केली जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून खासगी प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांत रत्नागिरीत खासगी विमान सेवा सुरू होईल, असे श्री. राऊत यांनी सांगितले. तसे झाले तर रत्नागिरीकरांची अनेक वर्षांपासूनची हवाई सफरीची अपेक्षा पूर्ण होणार आहे.

Web Title: Ratnagiri News Vinayak Raut comment