मत्स्य महाविद्यालय कृषी विद्यापीठाशीच संलग्न - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

रत्नागिरी - शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठास जोडणार नाही. ते कृषी विद्यापीठातच राहील. यासंदर्भात कृषिमंत्री अर्जुन खोतकर व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

आडिवरे (ता. राजापूर) येथे आले असता त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठाचे निकाल यंदा वेळेतच लागतील. यंत्रणेतील दोष दूर केले आहेत. ऑनलाइनमुळे सोयी झाल्याने उपकेंद्राचे काम कमी झाले आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम रत्नागिरी उपकेंद्रात सुरू होण्यासाठी व त्याच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई की कोकण विद्यापीठ हवे यासंदर्भात विद्यार्थ्यांचे मत घेऊनच निर्णय होईल. वकिली व्यवसाय करणारे प्राध्यापक असल्याने विधी अभ्यासक्रमाचे निकाल उशिरा लागले. काही निकाल वेळेत लागले, तर ज्यांना परदेशांत शिक्षणाला जायचे होते त्यांना २४ तासांत तसे प्रमाणपत्र दिले. कोकण विद्यापीठासंदर्भात यापूर्वी विधानसभेत सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मतांचा विचार करूनच निर्णय होईल.

शासकीय तंत्रनिकेतन इथेच राहणार आहे. रत्नागिरी, सावर्डे, चिपळूण येथे तंत्रनिकेतन आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत, निधी लागतो. तो नसल्यानेच तंत्रनिकेतन अद्ययावत करून कोकणातील विद्यार्थ्यांना शासकीय फीमध्ये पदवी शिक्षण घेता यावे यासाठी पाऊल टाकले होते; परंतु प्राध्यापकांना बदली होईल, अशी भीती वाटली. नंतर आंदोलन उभे राहिले व दुर्दैवाने त्याला लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला, त्यांना पदवीचे महत्त्व कळले नाही. 
- विनोद तावडे

Web Title: Ratnagiri News Vinod Tawade Press