रत्नागिरीत पाण्याचा खेळखंडोबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - खंडित वीजपुरवठा, फुटलेल्या जलवाहिन्या, त्यांची दुरुस्ती आदींमुळे शहरात तीन दिवस पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे. टंचाईग्रस्त भागात टॅंकरची मागणी वाढली आहे. त्यालाही काही शुल्क आकारल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेक वर्षांपासून न सुटणाऱ्या पाण्यासारख्या या जटिल प्रश्‍नावर शहरातील सुधारित नळपाणी पुरवठा योजना ही एकमेव रामबाण उपाय आहे. दीड वर्षांमध्ये योजना कार्यान्वित झाल्यास शहरवासीयांना भविष्यातील ३० वर्षांसाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे. 

शहरामध्ये नाचणे, उद्यमनगर, अभ्युदयनगर या शहराच्या वरच्या भागासह पेठकिल्ला व अन्य भागात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. पावसाळ्यातच नागरिकांना गेले चार दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रामुख्याने शीळ आणि पानवल धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. चार दिवस झाले, शीळ जॅकवेलमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे पाणी उपसा वारंवार बंद पडतो.

पालिकेला महावितरण कंपनीने एक्‍स्प्रेस फीडर मंजूूर केले आहे; मात्र त्याच्या उभारणीला काही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळेच शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शीळची जलवाहिनी फुटली. ती दुरुस्त झाली, तोवर पर्यायी व्यवस्था असलेल्या पानवल धरणाची जलवाहिनी फुटली. आळीपाळीने त्यांची दुरुस्ती निघाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. जुन्या जलवाहिन्यांचे शहरात पसरलेले जाळे खराब झाले आहे. त्या चोकअप झाल्या आहेत किंवा फुटल्या आहेत. 

पाणीटंचाईच्या या समस्येवर उपाय म्हणूनच शहरासाठी सुधारित नळपाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी निविदा काढून कामाला मंजुरी दिली आहे; परंतु विरोधकांनी त्यामध्ये वाढीव दरवाढीचा खो घातला आहे. त्यासाठी ते कायदेशीर लढाई लढण्यास तयार झाले आहेत; मात्र तत्काळ या योजनेचे काम सुरू व्हावे, अशी सत्ताधाऱ्यांची धारणा आहे.

चार दिवस झाले, आम्ही शीळ आणि पानवल धरणाच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करीत आहोत. दुरुस्ती झाली तर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी उपसा होत नाही, अशा अनेक समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. २४ तास झटूनही शहरवासीयांना मुबलक पाणी देता येत नाही, हीच आमची खंत आहे.
- निमेश नायर, पाणी सभापती, रत्नागिरी पालिका

Web Title: Ratnagiri news wastage of water