झर्येतील तलावाला गळतीने धोका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

राजापूर - मुसळधार पावसामुळे झर्ये येथील पाझर तलाव भरून वाहत असून पायथ्याला गळती सुरू झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याच्या दबावाने तो फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. बुडीत क्षेत्रातील दोन घरांपर्यंत पाणी पोचले असून तेथील रस्ता वाहून गेला आहे. त्या कुटुंबांचे स्थलांतर करा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या. तसेच नावेरी नदीकाठावरील चार गावांना सावधानतेचा इशाराही दिला आहे.

राजापूर तालुक्‍याच्या टोकाला डोंगराळ भागात झर्ये गाव आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या तलावाचे काम सुरू झाले. त्यासाठी ५१ लाखांचा खर्च होणार असून शंभर हेक्‍टरपर्यंत बुडीत क्षेत्रात येणार आहे. या पाझर तलावाचे काम अर्धवट आहे. राजापूर तालुक्‍यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला आहे. बंधाऱ्यांवरून पाणी वाहू लागले आहे. त्याशिवाय पायथ्याला गळती लागली आहे. 

बंधाऱ्याच्या आतील भागांना पडलेल्या भेगांमधून झिरपले पाणी वेगाने बाहेर पडत आहे. अधिक पाऊस पडला तर तलावाचे भवितव्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आपत्ती नियंत्रण कक्षाला सूचना दिली होती. राजापूर तहसीलदार श्रीमती वराळे यांनी पाझर तलावाला भेट दिली. या वेळी पाणीपुरवठा विभाग, पोलिस अधिकारी होते. या प्रकल्प परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तलावाचे बांधकाम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत आहे. आमदार राजन साळवी यांनी पाझर तलावाची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या.

सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग अधिक होऊ शकतो. ते पाणी नावेरी नदीवाटे वाहत पुढे जाते. त्या नदीची पातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या  कोंडगे, रिंगणे, कुरंग, कोंडगे या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नावेरी नदी पुढे अर्जुना नदीला जाऊन मिळते. अर्जुना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Ratnagiri News water leakage in Zhare pond