साखळकोंड जिल्ह्यातील टँकरमुक्त पहिलेच गाव

संदेश सप्रे
शुक्रवार, 11 मे 2018

संगमेश्‍वर - जलस्वराज्याचा पहिल्या टप्प्यात काम करताना अनेक अडचणी आल्या त्यावर मात करीत जलस्वराज्याच्या दुसर्‍या टप्प्यात नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करुन नजीकच्या साखळकोंड गावातील ग्रामस्थांनी एकीने काम करीत गाव टँकरमुक्त केला. जलस्वराज्याच्या दुसरा टप्प्यात यशस्वीपणे काम करणारा साखळकोंड जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे.​

संगमेश्‍वर - जलस्वराज्याचा पहिल्या टप्प्यात काम करताना अनेक अडचणी आल्या त्यावर मात करीत जलस्वराज्याच्या दुसर्‍या टप्प्यात नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करुन नजीकच्या साखळकोंड गावातील ग्रामस्थांनी एकीने काम करीत गाव टँकरमुक्त केला. जलस्वराज्याच्या दुसरा टप्प्यात यशस्वीपणे काम करणारा साखळकोंड जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

तालुक्यातील फुणगूस डिंगणी मार्गावरील डोंगरावर वसलेल्या साखळकोंडची लोकसंख्या 425 आहे. या गावात कायम पाण्याची टंचाईच होती. त्यामुळे टँकर गावकर्‍यांच्या पाचवीला पुजलेला. येथील टंचाई दूर करण्यासाठी जलस्वराज्य योजना राबविण्याचा प्रयत्न झाला. बोअरवेल, विहिरींना पाणीच लागले नाही.

जलस्वराज्यच्या दुसर्‍या टप्प्यात टंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. गावाच्या वरील बाजुला असलेल्या नैसर्गिक पाण्यावर साठवण टाकी बांधण्याचे ठरविण्यात आले. यासाठी जि.प.सदस्या रचना महाडिक यांनी सहकार्य केले. जर्मन तंत्रज्ञानाचा उपयोग करत 4 महिन्यात 7 लाख लिटर क्षमतेची टाकी उभी राहिली. जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यातील हे पहिलेच गाव असल्याने जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणी येवून पहाणी केली. आता हा गाव टँकरमुक्त झाला आहे. या टप्प्यात येथे 44 लाखाचा खर्च झाला. 

काहीही करून गावाला टँकरमुक्त करायचेच हा ध्यास ग्रामस्थांनी घेतला होता. जि.प. सदस्यांसह सर्व ग्रामस्थांचे यात मोलाचे सहकार्य लाभले. चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी आम्ही टँकरमुक्तीचा आनंद घेत आहोत. ग्रामस्थांचे श्रमदान आणि वेळ पडल्यास आर्थिक सहकार्य हेच या यशाचे गमक आहे.”

- कल्याणी कानसरे, सरपंच

Web Title: Ratnagiri News water problem solution in Sakhalkond