ई- मॅमल अंतर्गत विद्यार्थांमार्फत वन्य जीव डाटा संकलन

नागेश पाटील
बुधवार, 16 मे 2018

चिपळूण - ई- मॅमल हा प्रकल्प 17 देशांत राबविण्यात येतो. भारतात प्रथमच तो राबवून वन्यजीवांची माहिती घेतली जात आहे. सह्याद्री  जैवविविधतेने संपन्न आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शाळांत राहा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला. दुसर्‍या टप्प्यात  सह्याद्री निसर्ग मित्र, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) चे सहकार्य लाभले आहे.

सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे फेब्रुवारी 2017 पासून पश्‍चिम घाट आणि पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 7 जिल्ह्यांतील 20 शाळांमध्ये प्रकल्प राबविला जात आहे. प्रत्येक शाळेला 3 ट्रँप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी व मेमरी कार्डस, माहितीपत्रिका दिली आहे. 5 ते 10 विद्यार्थ्यांचा गट परिसरात कॅमेरे बसवतात. मिळालेली छायाचित्रे विद्यार्थी स्वतः ई- मॅमल वेबसाइटवर अपलोड करतात. एसएनएमचे प्रकल्प अधिकारी प्रसाद गोंड, सागर रेडीज, अनिकेत देसाई आणि राजेंद्र हुमारे परीक्षण करतात. वर्षभरात विद्यार्थ्यांद्वारे ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. आलेले फोटो ई- मॅमल वेबसाइटवर अपलोड झाले. ही शास्त्रीय माहिती असून  संशोधनासाठी उपयुक्त ठरू शकते. 

एक नजर - 

  • एप्रिल 2017 ला ई- मॅमलची पहिली कार्यशाळा 
  • प्रकल्पास आयसीआयसीआय बँकेचे अर्थसाह्य 
  • नॉर्थ कॅरोलिना नॅचरल सायन्सेसच्या संग्रहालयाद्वारे पाठिंबा 

पट्टेरी वाघही कॅमेर्‍यामध्ये टिपले

आतापर्यंत कॅमेर्‍यामध्ये पट्टेरी वाघ, अस्वल आणि बिबट्या, खवले मांजर, साळिंदर, भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळमांजर, मुंगूस व माकडे आदी वन्यप्राणी टिपले गेले आहेत. 

ग्रामीण व आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना अधिक माहिती देऊन त्यांच्यात जैवविविधता जतन करण्याची क्षमता व ज्ञान देण्याचा प्रकल्पाचा हेतू आहे. या वयात प्रगत तंत्रज्ञानाचा प्रथम अनुभव घेणारे विद्यार्थी खूपच भाग्यवान आहेत. ते त्यांच्या गावात प्राण्यांचा अभ्यास करत आहेत.

- भाऊ काटदरे, अध्यक्ष, सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण

Web Title: Ratnagiri News wildlife data collection under E Mamal