निगेटिव्ह-पॉझिटिव्ह मुलांसाठी करबुडे येथे होणार वसतिगृह

निगेटिव्ह-पॉझिटिव्ह मुलांसाठी करबुडे येथे होणार वसतिगृह

रत्नागिरी - येथील गुरुप्रसाद संस्था ही गेली अठरा वर्षे एचआयव्ही संसर्गित व्यक्तीवर काम करीत आहे. सध्या संस्थेत ‘विहान’ प्रकल्पातून काम सुरू आहे. प्रकल्पात जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७१९ रुग्णांची नोंद आहे. यामध्ये लहान मुला-मुलींचाही समावेश आहे. 

परिस्थिती नसल्याने संसर्गित मुलांना कुठे ठेवावे हा गंभीर प्रश्‍न उभा राहतो. यासाठी संस्थेने एक पाऊल पुढे टाकले. पाठबळ नसतानाही करबुडे येथील जागेत निगेटिव्ह व पॉझिटिव्ह मुलांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहे. या उभारणीसाठी हातभार मिळावा, इमारतीसाठी लागणारे साहित्य देणगीद्वारे दानशुरांनी द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

करबुडे येथे जागा घेऊन कंपाऊंड वॉल बांधण्यात आली आहे. दीड कोटीचा प्रस्ताव आहे. शासनाकडून कोणतीही मदत अथवा सहकार्य नाही. खासगी जागा घेऊन हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. २००४ ला संस्थेची स्थापना झाली. 

डिसेंबर २०१३ ते २०१७ पर्यत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या संसर्गित २ हजार ७१९ इतकी आहे. रुग्णांना समुपदेशन, नियमित सेवा देण्यात येत आहे. शासनाची बालसंगोपन योजना कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतून १४३ मुलांचे गुरुप्रसाद संस्थेतून अर्ज भरण्यात आले आहेत. योजनेची सुरवात सप्टेंबर महिन्यात झाली. ऑक्‍टोबर महिन्यात रत्नागिरी आणि चिपळूण येथे कॅंप घेऊन १४३ बाधित मुलांचे अर्ज भरण्यात आले. 

दानशुरांनी हातभार द्यावा
संसर्गित मुलांची शैक्षणिक वाटचाल थंडावत आहे. मुलांची होणारी आबाळ लक्षात घेऊन संस्थेने निगेटिव्ह-पॉझिटिव्ह अशा दोन्ही मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचे ठरविले आहे. सिमेंट, दगड अशा प्रकारची मदत दानशूर लोकांनी केली तर प्रकल्पाला हातभार लागेल. त्यामुळे दानशुरांनी मदत करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक मिलिंद राजवाडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com