सावर्डेत रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यु

प्रकाश पाटील
मंगळवार, 29 मे 2018

सावर्डे - पहाटे तुतारी एक्सप्रेस सावर्डे रेल्वे स्थानकावर आली. गाडीचा वेग मंदावला होता. गाडीतून मुंबई सावर्डे प्रवास करणारा शुभंम संजय सोलकर ( वय 18, रा. डेरवण गणेशवाडी ) याचा रेल्वेतून प्लॅटफॅार्मवर उतारताना अंदाज चुकला आणि होत्याचे नव्हते झाले. शुभम रेल्वेच्या खाली गेला. अंगावर रेल्वे गेल्याने तो जखमी झाला पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.

सावर्डे - पहाटे तुतारी एक्‍सप्रेस सावर्डे रेल्वे स्थानकावर आली. गाडीचा वेग मंदावला होता. गाडीतून मुंबई सावर्डे प्रवास करणारा शुभंम संजय सोलकर ( वय 18, रा. डेरवण गणेशवाडी ) याचा रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उतारताना अंदाज चुकला आणि होत्याचे नव्हते झाले. शुभम रेल्वेच्या खाली गेला. अंगावर रेल्वे गेल्याने तो जखमी झाला पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. 

ठाणे येथे वास्तव्यास असणाऱ्या चुलत्याना आंबे देवून तो मुंबईहून सावर्डेला तुतारी एक्‍सप्रेसने येत होता. पहाटे साडे पाच वाजता सावर्डे रेल्वे स्थानकावर उतरत असताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील मोकळ्या पोकळीमध्ये त्याचा पाय गेल्याने तो रेल्वेच्या खाली खेचला गेला. या अपघातामध्ये डावा पाय तुटला. छातीवर मोठा आघात झाला. अशा गंभीर अवस्थेत शुभमला रेल्वे प्रशासनाने डेरवण रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झालेल्या शुभमची उपचारा दरम्यान सकाळी नऊ वाजता प्राणज्योत मावळली. 

एकुलता एक असणारा मुलगा खेर्डी येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. हरहुन्नरी व लोकप्रिय होता. शुभंमचा मित्र परिवार मोठा होता. प्रत्येकाला हवाहवासा असणारा शुभम गऱीब कुटूंबातील आईवडीलांचा आधार हरपला. त्याच्या मृत्युने सावर्डे व डेरवण परिसरात शोककळा पसरली आहे. 

Web Title: Ratnagiri News youngster fall from train and dead