रत्नागिरी : जादा भाडे आकारल्यास खासगी बसवर कारवाई

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन
जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!
जादा प्रवासी शुल्क आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर 'आरटीओ'चा वॉच!Sakal

रत्नागिरी : गर्दीच्या हंगामात खासगी बसमालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही. असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ ला शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. खासगी, कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकराणी, तसेच प्रवाशांनी dycommrenf2@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com