रत्नागिरी : झेपावताहेत स्वयंसिद्धतेकडे

जिल्ह्यात साडेपाच हजारांपेक्षा अधिक महिला प्रशिक्षित; १५० मुलींना ब्लॅकबेल्ट
Martial arts
Martial artssakal

सध्याच्या काळात मुली, तरुणी, महिलांसाठी एक गोष्ट जीवनशैलीला जोडली जाणे आवश्यक आहे, ती म्हणजे स्वसंरक्षण. विपरित परिस्थितीत स्वतःच रक्षण स्वतः करता येण्यासाठीची कला आत्मसात करण्याकडे मुलींचा कल वाढू लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ तायक्वाँदो या मार्शल आर्ट मधल्या एका खेळाचं प्रशिक्षण सुरू आहे. आजवर हजारो मुलं ह्या खेळात प्रशिक्षित झाली आहेत. ही कसली मारामारी? हा मुलांचा खेळ. नको बाई, मुलगी कायमची हात-पाय मोडून बसली तर? साधारण ह्या प्रकारच्या प्रतिक्रिया सुरुवातीच्या काळात पालकांच्या असायच्या. मात्र, जिल्ह्यातील तायक्वाँदो या खेळात राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उंचावत सुवर्णपदक मिळवणारी पहिली मुलगीच होती, तेव्हा त्याचे महत्त्व सर्वांना पटू लागले. आज प्रत्येक तालुक्यात या खेळाचं प्रशिक्षण केंद्र असून मुलांच्या बरोबरीने या खेळाचं प्रशिक्षण पालक आपल्या मुलींनाही देण्यासाठी आपणहून प्रवेश घेत आहेत. हे अत्यंत सकारात्मक अस चित्र आहे. आज या खेळातून प्रशिक्षित झालेल्या मुली पोलिस, आर्मी, डॉक्टर, वकील, नर्स, रेल्वे पोलिस, राजकारण, क्रीडा प्रशिक्षक या सर्व क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.

...तुम्ही अडचणीत आहात, करा ‘डायल ११२, १०९१’

अचानक काही अडचण आली, गंभीर प्रसंग ओढविण्याची शक्यता आहे, तर घाबरण्याचे कारण नाही. मदतीला आहे ‘डायल ११२’ हा क्रमांक. पोलिस नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ त्या व्यक्तीचे लोकेशन मिळते. त्यानंतर पोलिसांची एक टीम दहाव्या मिनिटाला घटनास्थळी दाखल होऊन, त्या पीडिताला मदत करते. अडचणीतील अनेक महिला-पुरुषांना डायल ११२ टीमने मदत केली आहे. जिल्ह्यात ५६ गाड्यांवर २०९ प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर २०२१ मध्ये ही यंत्रणा जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये कार्यान्वित केली आहे. जिल्हा पोलिस दलातील सुमारे २०९ कर्मचाऱ्यांना आणि चार ते सहा अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण तसेच अत्याधुनिक चारचाकी, दुचाकी वाहने दिली आहेत.

रणरागिणी सज्ज...

प्रामुख्याने तायक्वाँदो या मार्शल आर्टच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील अशा अनेक तरुणी आणि महिला स्वसंरक्षणाचे धडे घेत आहेत. त्यामुळे अडचणीवेळी चार हात करून स्वतःची सुटका करण्याएवढ्या त्या तरबेज आणि स्वयंसिद्ध झाल्या आहेत. जिल्हा पोलिसदलदेखील महिलांच्या सुरक्षच्या दृष्टीने सतर्क आणि जागृत आहे. हेल्पलाईन १०९१ तसेच डायल ११२ या सुविधा पोलिस दलाने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासह व्यक्तिगत पातळीवर तसेच संस्थात्मक पातळीवर, शाळा, महाविद्यालये आणि काही संस्था महिला, तरुणी, किशोरींना मानसिक, शारीरिकदृष्ट्या कणखर बनवत आहेत. अत्याचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी महिला कधी रणरागिणी, दुर्गा, चंडिका अवतारधारण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com