रत्नागिरी : सिग्नल यंत्रणेत बिघाड ?; ‘सावनी’ नजरेआड

१९६० कि. मी. प्रवासानंतर कासव नॉट रिचेबल; दोन कासवं सपर्कात, कर्नाटकच्या किनारपट्टीवर आढळ
‘सावनी
‘सावनीsakal

रत्नागिरी : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी सावनी संपर्क तुटला आहे. या कासवाने आतापर्यंत १९६० किलोमीटरचा प्रवास केला आहे. पाच पैकी तीन कासवं नॉटरिचेबल झाली असून दोन कासवांशी संपर्क असून ती दक्षिणेकडे कर्नाटकच्या किनारीपट्टीवर आढळली आहेत.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागासह कासवमित्रही सरसावले आहेत. ही कासवं एका किनाऱ्‍यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, यावर अजूनपर्यंत अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमाफत वेळास, आंजर्ले, गुहागर किनाऱ्‍यांचा पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. कोकणातील किनाऱ्‍यांवर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे.

कासवांचा प्रवास सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम लक्ष्मी कासवाचा संपर्क तुटला. २ मार्चला त्याची शेवटची नोंद मिळाली होती. त्यानंतर प्रथमा कासवाचा संर्पक तुटला आणि त्यापाठोपाठ ५ जूनला सावनी कासव नॉटरिचेबल झाले आहे.

अशी आहेत निरीक्षणे

अंडी घातल्यानंतर खोल समुद्राकडे वाटचाल

एक कासव दोन वेळा अंडी घालू शकते

प्रथमा वेगाने पुढे सरकतेय

वनश्री, रेवा अंडी घातल्या ठिकाणी रेंगाळताहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com