अनंत गीतेंवर टीका करणारे खासदार गेले कोठे?

अनंत गीतेंवर टीका करणारे खासदार गेले कोठे?

गुहागर - तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ४० नुकसानग्रस्तांना शिवसेनेतर्फे जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करण्यात आली. पालकमंत्र्यांनी पायाभूत सुविधांच्या पुर्ननिर्माणासाठी २५ कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, गुहागरवासीयांवर नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर येथील खासदार कोठे आहेत. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर टीका करणारे खासदार का आले नाहीत, याचा जाब मतदारांनी विचारावा, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केली. 

पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या दौऱ्यानिमित्ताने कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याची पाहणी पालकमंत्र्यांनी केली.  तालुक्‍यातील रस्ते, संरक्षक बंधारे, साकव, पाण्याचे अतिक्रमण होणारी ठिकाणे यांची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून २५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन वायकर यांनी दिले आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शिवसैनिक शासनाला मदत करत आहेत. गुहागर शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीला नगरोत्थान योजनेतून यापूर्वी दीड कोटींचा निधी देण्यात आला. या आर्थिक वर्षात १ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी दिला आहे.

शहरामध्ये बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी जिल्हा नियोजनामधून सुमारे ५० लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. आजपर्यंत रायगड लोकसभा मतदार संघातून निवडून गेलेले सेनेचे नेते अनंत गीते हे आपत्तीच्या काळात जनतेच्या सोबत राहिले आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत व आजही होत आहेत. गुहागर तालुक्‍यातील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी अनेक शाळांना केंद्र सरकारतर्फे आर्थिक सहकार्य केले आहे.

क्रीडा संकुल चुकीच्या ठिकाणी 
मोडकाआगर पूल बंद होऊन १ महिना होत आला. गुहागर शहरासह असगोली, पालशेत, वरवेली, आदी गावांतील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचा विषय केंद्र सरकारच्या अधीन असतो. गुहागरवासीयांच्या या अडचणींची चौकशी करण्यासाठी, खासदार गुहागर तालुक्‍यात आले नाहीत. त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांनी याचा जाब विचारण्याची गरज आहे. देवघर येथे बांधलेले क्रीडा संकुल चुकीच्या ठिकाणी झाले आहे. शिवसैनिक लवकरच तेथे श्रद्धांजली वाहणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com