रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

चिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे.

चिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाची ताकद कमी झाली. आता या मतदार संघात काँग्रेसचा एकही आमदार नाही. दहा वर्षापूर्वी नीलेश राणे या मतदारसंघातून निवडून आले होते.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला. नंतर काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राणेंनी काँग्रेस सोडली. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, स्वाभिमान पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, काँग्रेसमधील वातावरण पूर्णपणे शांत आहे.

हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. चिपळूण दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचा इन्कार केला. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मतदारसंघात काँग्रेसची फारशी ताकद नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडून जिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी जागा राष्ट्रवादीकडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- इब्राहिम दलवाई, प्र
देश सरचिटणीस, काँग्रेस

...नंतर वातावरण पुन्हा शांत
राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतरही दोन्ही जिल्ह्यात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखावा झाला. पक्षाचे निरीक्षक विश्‍वनाथ पाटील, खासदार हुसैन दलवाई यांनी कोकणचा दौरा केला व ठिकठिकाणी मेळावेही घेतले. नंतर काँग्रेसमधील वातावरण पुन्हा शांत झाले.

Web Title: Ratnagiri SIndhudurg Constituency Congress candidate