रत्नागिरीत विध्यार्थानी घातले चक्क झाडांचे बारसे​...

ratnagiri  students for tree planting
ratnagiri students for tree planting

रत्नागिरी : शाळकरी मुलांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी यासाठी रत्नागिरी तालुक्यातील वाटद कवठेवादी शाळेत 'झाडांचे बारसे' ही स्पर्धा आयोजित केली होती. वर्षभरापूर्वी केलेल्या लागवडीतील झाडे कशी आहेत यावर या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. यानिमित्तमाने लावलेली 35 झाडे जंगली आहेत.

या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. जुलै महिन्यात शाळेने दिलेल्या झाडाचे रोप लावायचे, त्याला स्वतःचे वा स्वतःच्या आवडीचे नाव द्यायचे आणि वर्षभर त्या झाडांची काळजी घेत त्याला वाढवायचे असे नियोजन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.

वृक्ष लागवडीसाठी विध्यार्थाकडून झाडांचे बारसे​

या स्पर्धेचे उद्घाटन जुलै महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना नारळाच्या रोपांचे वितरण करण्यात आले होते. ही रोपे वाटद ग्रामपंचायत आणि पालक निधीतून खरेदी करण्यात आली होती. या रोपांची लागवड करणे आणि निगा राखण्यासंदर्भात योग्य त्या सूचना त्या - त्या वेळी शाळेच्या वतीने देण्यात आल्या. तसेच ठराविक कालावधीनंतर झाडांची निरीक्षणे शाळा जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष एकनाथ धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, शाळेतील शिक्षक गोविंद डुमनर, माधव अंकलगे यांनी केली होती.

त्यानुसार वर्षभर असणारी झाडांची वाढ, त्यासंबंधीच्या नोंदी आणि अंतिम भेटी वेळी तज्ञ परीक्षकांनी केलेल्या नोंदी यांची एकत्रित सांगड घालून दोन्ही गटांचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार या स्पर्धेत पहिल्या गटात विराज शाम आलीम, साहिल विलास तांबटकर, यश पंकेश धनावडे आणि दुसऱ्या गटात आयुष भरत धनावडे, सोहम शशिकांत कुर्टे, स्वप्नील भास्कर घवाळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.


या सापर्धेचे परीक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत धोपट, सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष सुरेश तांबटकर, जीर्णोद्धार समितीचे सदस्य सुरेश घवाळी यांनी केले. 
या उपक्रमाची फलनिष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेल्या एकूण ३५ झाडांपैकी एक वगळता ३४ झाडे अगदी सुस्थितीत आहेत. शाळेच्या या उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या श्रमनुभवासाठी सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com