Ratnagiri : वाशिष्ठीच्या पुलाचे काँक्रिट उखडले

बांधकाम दर्जाविषयी शंका; एका महिन्यातच दुर्दशा, खासदार राऊतांच्या हस्ते झाले होते उद्‌घाटन
kokan
kokansakal

चिपळूण : गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील चौपदरीकरणातील नवीन वाशिष्ठी पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू झाला; मात्र महिनाभराच्या कालावधीतच पुलावरील काँक्रिट उखडत चालले आहे. पुलाचे काँक्रिट उखडल्याने त्यातील लोखंडी सळ्याही दिसू लागल्या आहेत. यामुळे पुलाच्या बांधकाम दर्जाविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे भूमिपूजन झाल्यानंतर २०१८ मध्ये वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या कामास सुरवात झाली. नंतर मूळ व पोटकंत्राटदार यांच्यातील वादात हा पूल रखडला. पुढे मुळ कंत्राटदार बदलून हा पूल ईगल चेतक इन्फ्रा कंपनीकडे २०१९ मध्ये सोपवण्यात आला. २४७.५ मीटर लांबीचा असलेला हा पूल कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा आहे.

एका मार्गिकेची रुंदी ही १२ मीटरची असून त्याची फाउंडेशनपासूनची उंची १४.३०० मीटर इतकी आहे; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या पुलावरील वाहतुकीसाठी दिलेली मुदत, जवळ येऊन ठेपलेला गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर या पुलाचे काम घाईगडबडीत करण्यात आले असल्याचा आरोप त्या वेळी केला होता.

kokan
सावंतवाडी : गाडीमध्ये सुसाईड नोट लिहून बेपत्ता, केला आत्महत्येचा बनाव

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या पुलावर आता महिनाभराच्या आतच खड्डे पडू लागले आहेत. चिपळूणहून मुंबईकडे जाताना पुलावरील शेवटच्या टोकाला कळंबस्ते येथे तर काँक्रिट पूर्णपणे जाऊन आतील लोखंडी सळ्याच बाहेर पडल्या आहेत. अवघ्या २० दिवसांतच कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन पुलाचे काँक्रिट उडून जात सळ्याच बाहेर पडल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. पुलाच्या या दुर्दशेबाबत एकही राजकीय पदाधिकारी काहीच बोलताना दिसत नाही. उदघाटनाला सर्व राजकीय मंडळी उपस्थित होती; मात्र आता सर्व चिडीचूप झाल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे.

एक नजर

  1.  २०१८ मध्ये वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या कामास प्रारंभ

  2.  मूळ व पोटकंत्राटदार यांच्यातील वादाने पूल रखडला

  3.  ईगल चेतक इन्फ्रा कंपनीकडे २०१९ मध्ये पूल सोपवला

  4.  महामार्गावरील २४७.५ मीटर सर्वात मोठ्या लांबीचा पूल

  5.  गणेशोत्सव पार्श्वभूमीवर काम घाईगडबडीत केल्याचा आरोप

  6.  कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या पुलाचे काँक्रिट उडाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com