दापोलीत रिकाम्या बाटल्यांसाठी बसवले पिंजरे परंतू यात 'आढळले".....

Ratnagiri Tourism Secure In Tourist Kokan Marathi News
Ratnagiri Tourism Secure In Tourist Kokan Marathi News

दाभोळ  (रत्नागिरी) : पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यासाठी बसविण्यात आलेल्या तारेच्या पिंजऱ्यात कपड्यांसह इतर वस्तू आणि कचरा टाकल्याचे आढळल्याने मूळ हेतूलाच धक्का बसला आहे. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जमा करण्यासाठी केलेली ही व्यवस्था तापदायक ठरली आहे. याला नागरिकांचे सहकार्य पाहिजे, तसे मिळालेले नाही. 


दापोली नगरपंचायत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती यांच्या वतीने दापोली शहरातील विविध ठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यासाठी तारेचे पिंजरे बसविण्यात आले असून या पिंजऱ्यांचा नागरिकांकडून दुरुपयोग होत असून त्यात आता नागरिकांनी खराब कपडेही टाकण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता हे पिंजरे ‘माणुसकीच्या भिंती’ सारखे ‘माणुसकीचे पिंजरे’ तर होत नाहीत ना, अशी चर्चा दापोलीत सुरू आहे. तालुक्‍यातील बहुतांश पर्यटनस्थळांकडे तसेच समुद्रकिनारी जाण्यासाठी दापोली शहरातूनच जावे लागते. 

कोकणात पर्यटनाला जाताय  'ही' काळजी घ्या.....

त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने शहराचे महत्त्व वाढीला लागले आहे. दापोलीत येणारे पर्यटक पाणी पिऊन प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावरच टाकत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जलकल्याण समितीने विविध उद्योजकांच्या सहकार्याने नगरपंचायतीची परवानगी घेऊन पाण्याच्या या रिकाम्या बाटल्या टाकण्यासाठी तारेचे पिंजरे बसविले आहेत. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वाधिक रिकाम्या बाटल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्रासमोरील पिंजऱ्यात जमा झाल्या आहेत.

उपजिल्हा रुग्णालयासमोर..
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या जॉली क्‍लबसमोरील या तारेच्या पिंजऱ्यात लोकांनी रिकाम्या बाटल्यांबरोबरच खराब कपडेही टाकल्याने या पिंजऱ्यांचा आता दुरुपयोग सुरू झाला आहे. अशाप्रकारे बेजबाबदार नागरिकांकडून कपडे टाकले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com