परदेशात कशाला, पर्यटनासाठी रत्नागिरीत या..!

ratnagiri tourism special story
ratnagiri tourism special story

रत्नागिरी: कोरोनातील टाळेबंदीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन पूर्ववत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. अनेकजणं निसर्ग पर्यटनस्थळे बाजूला ठेवून परदेशात जात होते. त्यांनी कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. रत्नागिरीतील पर्यटनस्थळांची माहिती देणारा व्हीडीओही प्रसिद्ध केला आहे.


सहा महिने घरीच बसलेला हा पर्यटकांचा वर्ग सध्या राज्यांर्तंगत पर्यटनास निघाला आहे. अशी पुणे, मुंबई, कर्नाटक, आंध्र, गुजरात मधील बहुतांशी पर्यटक सध्या महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टी, महाबळेश्‍वर तसेच गोवा पर्यटनाला निघाले आहेत. यापैकी अनेकांनी कोल्हापुरात हॉटेल बुकिंग केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमटीडीसीचे रिसॉर्ट ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बुकिंग झाले आहे. यात डोंगर दऱ्या, जंगल, सुमद्र किनारे, थंड हवेची ठिकाणे येथे बुकिंग झाले आहे. यात तारकर्ली, गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्‍वरसह राज्यातील १८ रिसार्टचा समावेश आहे. लॉकडाउन काळात विमान सेवा बंद झाल्याने पैसे पर्यटकांचे अडकून पडले होते. यातील बहुतांशी विदेशी विमान सेवा सुरू झाल्यानंतर विदेशी पर्यटनाला जाण्याचा निर्णय घेतला. 
निसर्गरम्य अशा ठिकाणी सुरक्षिततेची हमी असेल तर त्या ठिकाणी पर्यटकांचा कल आहे.

ही बाब लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दापोलीतील किनारे, गणपतीपुळे, पावस, विविध मंदिरे, गुहागरचा शांत किनारा या ठिकाणी पर्यटक येऊ शकतात. डॉल्फिन पर्यटकांचे आकर्षण ठरु शकतात. आकर्षक व्हिडीओ जिल्हा प्रशासनाने बनवला आहे. त्यामध्ये पर्यटनस्थळांची माहिती, निवासाची व्यवस्था याची माहिती आहे.


ख्रिसमसमध्ये गर्दी वाढणार
दिवाळी पाडव्यानंतर गणपतीपुळे, दापोलीसह विविध पर्यटनस्थळांवरील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. गणपतीपुळेत दिवसाला पाच हजाराहून अधिक लोक येऊन जात आहेत. ही गर्दी ख्रिसमसमध्ये आणखीन वाढेल, अशी 
शक्‍यता आहे.

सहपरिवार नक्की या..
लॉकडाऊननंतर आपल्या मातृभूमीतील मनोहर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वेळ आली आहे. कोकणाला निसर्गाने भरभरुन दिलेला आमचा रत्नागिरी जिल्हा आहे. येथे सहपरिवार नक्की यावे. www.ratnagiritourism.in या संकेत स्थळावर भेट द्या आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com