रत्नागिरी - तरवळमध्ये वीज पडून दोन गुरे ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - परतीच्या पावसाने रत्नागिरी तालुक्‍यातील काही गावांना तडाखा दिला असून तरवळ-कुळ्ये वाडी येथे गोठ्यावर वीज पडली. यामध्ये दोन गुरे ठार झाली असून विजेच्या धक्‍क्‍याने एकजणं किरकोळ जखमी झाला आहे. ओरी येथे वादळामुळे दोन घरांचे नुकसान झाले असून जाकादेवी, भड्यातही पावसाने धुमाकुळ घातला होता. 

ऑक्‍टोबर हिटने रत्नागिरीकर त्रस्त झाले होते. गेले काही दिवस कडाक्‍याचे उन पडले होते. परतीच्या पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. सोमवारी (ता. 7) दुपारनंतरच अचानक आभाळ भरुन आहे. थंड गार वारे वाहू लागले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाला सुरवात झाली. विजांच्या तांडवाने सर्वांना भितीचे वातारवण निर्माण झाले होते. जयगड पंचक्रोशीतील ओरी गावात वेगवान वाऱ्यांनी झाडे उन्मळून पडली. येथील एक भले मोठे झाड घरावर कोसळले. या गावातील दोन घरांचे नुकसान झाले आहे.

पावसाचा फटका भडे, जाकादेवी परिसरालाही बसला. तरवळ येथील तुळजा भागोजी चंदरकर (वय 60) यांच्या गोठ्‌यावर वीज पडली. कडाडणाऱ्या वीजेच्या लोळामुळे जवळच भला मोठा खड्‌डा पडला होता. गोठ्यामध्ये तीन गुरे होती. त्यातील एक गाय आणि एक बैल ठार झाला. वीजेच्या लोळाच्या धक्‍क्‍याने तुळजा चंदरकर यांनाही किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करण्यात आले. सुदैवाने मोठी दुखापत झालेली नव्हती. 

शेतकऱ्यांची तारांबळ 
अचानक आलेल्या पावसामुळे भात कापणीचे काम सुरु असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापलेले भात सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी शेतकरी धावपळ करत होता. काही ठिकाणी कापलेली भात शेतामध्येच ठेवावी लागली. पडलेल्या पावसामुळे शेतं आडवी झाली आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Two cattle killed in lightning