आंग्रीया क्रूझच्या थांब्याची रत्नागिरीकरांना प्रतीक्षाच

राजेश कळंबटे
रविवार, 2 डिसेंबर 2018

रत्नागिरी - मुंबई ते गोवा जलमार्गाने आंग्रीया क्रूझ सेवा सुरू झाली; मात्र रत्नागिरीत थांबा मिळण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. क्रूझला थांबा देण्यासाठी रत्नागिरीत आवश्यक जेटी व अन्य सुविधा उपलब्ध नाहीत. यासंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीत एक दिवस थांबा देण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. पण सुविधा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत क्रूझला थांबा मिळणे अशक्य असल्याचे चित्र आहे.

रस्ते वाहतूक व बंदर विकासमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये आंग्रीया क्रूझला हिरवा झेंडा दाखविला. या क्रूझवर 104 खोल्या असून 400 पर्यटक यामधून प्रवास करू शकतात. तसेच डेक बार, रेस्ट्रो बार, डिस्को बार, जलतरण तलाव, स्पा, वाचनालय कक्ष यासह अनेक सुविधा क्रूझवर आहे.

मुंबई ते गोवा ते मुंबईपर्यंत थेट सेवा असल्याने यामध्ये रायगड, रत्नागिरी, मालवणमध्येही क्रूझला थांबा मिळण्यासाठी आता महाराष्ट्र सागरी मंडळही प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे रत्नागिरीतील भगवती बंदरमध्ये जेटी आहे. एक दिवस थांबा दिल्यानंतर पर्यटक रत्नागिरीत महत्त्वाच्या पर्यटनस्थळी भेट देऊ शकतील. सकाळी पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर पुन्हा या क्रूझवर पुढील प्रवासासाठी परततील, अशी त्यामागील कल्पना आहे.

रत्नागिरीत जेटी उपलब्ध आहे; परंतु क्रूझला थांबा देण्यापूर्वी ती जेटी व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जेटीत आणखी सुविधाही द्याव्या लागणार आहेत. पर्यटकांसाठी पूरक निवासव्यवस्था, शौचालये आणि अन्य सुविधा गरजेच्या आहेत. नव्याने जेटी उभारावी लागेल व त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून प्रयत्नही केले जात आहे. जेट्टी उभारल्यानंतरच रायगड व मालवणमध्येही रत्नागिरीप्रमाणेच थांबा मिळेल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

पर्यटनदृष्टीने मुंबई-गोवा क्रूझला एक दिवसासाठी रत्नागिरीतही थांबा मिळावा, यासाठी संबंधित क्रूझ हाताळणार्‍या कंपनीसोबत चर्चा सुरू आहे; मात्र जेटी व आवश्यक सुविधांची गरज आहे. त्या झाल्या तर पर्यटनाला चालना मिळेल.

- विलास पाटणे, रत्नागिरी

Web Title: Ratnagiri Waiting for angriya cruise stop