रायगडमध्ये ‘रेव्ह पार्टी’; बॉलिवूड अभिनेत्री आढळल्या नको त्या अवस्थेत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

- रायगड पोलिसांनी केली ही मोठी कारवाई.

- अमली पदार्थ करण्यात आले जप्त.

रायगड : रायगडमध्ये सुरु असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा आज (शुक्रवार) पोलिसांनी पर्दाफाश झाला. रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील अलिशान बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. 

एका आलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. या छापेमारीच्या कारवाईत चरस, कोकेन, विदेशी मद्य यासारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच या बंगल्यातून काही महिला आणि पुरूषांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह टीव्ही अभिनेत्रींचा समावेश होता.

दरम्यान, ज्या अलिशान बंगल्यावर छापा टाकण्यात आला तो बंगला प्रसिद्ध उद्योगपतीचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी ज्या लोकांना ताब्यात घेतले त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rave Party in Raigad Bollywood Actress Included in Rave Party

टॅग्स