राजापुरात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

राजापूर - तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २१) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्‍यातील १९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यामध्ये १ लाख १४ हजार ३८० मतदार जिल्हा परिषदेचे २१, तर पंचायत समितीचे ३९ असे ६० उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद करणार आहेत. 

राजापूर - तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २१) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्‍यातील १९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यामध्ये १ लाख १४ हजार ३८० मतदार जिल्हा परिषदेचे २१, तर पंचायत समितीचे ३९ असे ६० उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद करणार आहेत. 

तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी तब्बल २१, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी ३९ उमेदवार आपली ताकद आजमावत आहेत. यामध्ये बहुतांश गण आणि गटावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप अशी थेट लढत होणार आहे. काही ठिकाणी अपक्ष रिंगणात असल्याने चौरंगी लढत होत आहे. या निवडणुकीमध्ये ५१ हजार ९८५ पुरुष, तर ६२ हजार ३९५ महिला असे मिळून १ लाख १४ हजार ३८० मतदार मतदानाचा हक्क १९१ मतदान केंद्रांवर बजावणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हाती राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला मतदारांना उद्युक्त करण्याचे आव्हान राजकीय कार्यकर्त्यांसमोर राहणार आहे. 

या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी १ हजार १२५ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहायक कर्मचारी व पोलिस बंदोबस्त असे एकूण पाच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अठरा झोन तयार करण्यात आले असून, त्यामध्ये १८ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, काही राखीव कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा परिषद गटासाठी एक आणि पंचायत समिती गणासाठी एक अशी दोन ईव्हीएम मशिन्स ठेवली जाणार आहेत. ईव्हीएम मशीनवर जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाची, तर पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदाराला सुरवातीला जिल्हा परिषदेसाठी, तर त्यानंतर पंचायत समितीसाठी मतदान करावयाचे आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीमध्ये मतदान होणार आहे.

Web Title: Ready for the administration of elections rajapur