शिक्षक बदलीमुळे पालकांचा अधिकाऱ्यांना घेराव

सुनील पाटकर
सोमवार, 24 डिसेंबर 2018

महाड :  महाड तालुक्यांतील नाते येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेंत समायोजनातून रुजु झालेल्या शिक्षकेची केवळ महिनाभरातच पुन्हा अचानक बदली करण्यांत आल्याने शाळेंतील विद्यार्थाचे नुकसान होत आहे. शिक्षण विभागाकडून  याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यांत न आल्याने अखेर संपप्त पालकांनी येथील पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरुन घेराव घातला.

महाड तालुक्यांतील नाते येथील प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी इयत्ते पर्यत 43 विद्यार्थी शकत आहेत. बहूतांशी विद्यार्थी शेतकरी कुटूंबातील आहेत. नियमाप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्यांत येत असल्या तरी स्थानिक पातळीवर कामगिरीच्या नावाखाली शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. महाड तालुक्यांतील शिक्षकांच्या बदल्या 10 ऑक्टोबर 2018 ला ऑनलाईन पध्दतीने करण्यांत आल्या. शिरगाव गोरीवले कोंड येथील शाळा बंद झाल्याने या शाळेतील शिक्षिका अर्चना जालिंधर सुर्ये यांची नाते शाळेत बदली करण्यात आली. सदर शिक्षिका शाळेत हजर झाल्यानंतर 4 डिसेंबर पर्यत शाळेत काम करत होत्या. परंतु गोरिवले कोंड शाळा सुरु करण्यात आल्याने अचानक त्यांची गट शिक्षणाधिकारी यांच्या तोडी आदेशाने बदली पुन्हा गोरिवले कोंड येथे करण्यात आली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नाते ग्रामस्थांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे, संदिप खोपडे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व महिलांनी पंचायत समितीच्या कार्यालयातच ठाण मांडले.

प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेथ करत शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली.यावेळी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता चांदोरकर, कार्यालय अधिक्षक शशिकांत पगारे व सहाय्यक गट विकास अधिकारी एस.एम.सरकटे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. शिक्षकेची बदली कोणत्या कारणाने करण्यात आली असल्याचे व्यवस्थापन समितीने शिक्षण विस्तार अधिकारी यांना विचारले असता त्यांच्या कडून कोणतेही उत्तर समितीला देण्यांत आले नाही.

Web Title: The recruitment of the teacher to the guardian's officers