आधी पुनर्वसन मग, रिफायनरीचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

राजापूर -  नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीवरून प्रकल्पग्रस्तांच्या संघटना, विविध राजकीय पक्षांकडून विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, पानिपत रिफायनरी प्रकल्पालाला भेट, प्रकल्पग्रस्त गावांमधील सरपंचांशी संवाद साधल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी या दौऱ्याने आपल्या सर्व शंका दूर झाल्याची माहिती पत्रकाराना दिली.

राजापूर -  नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीवरून प्रकल्पग्रस्तांच्या संघटना, विविध राजकीय पक्षांकडून विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, पानिपत रिफायनरी प्रकल्पालाला भेट, प्रकल्पग्रस्त गावांमधील सरपंचांशी संवाद साधल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी या दौऱ्याने आपल्या सर्व शंका दूर झाल्याची माहिती पत्रकाराना दिली. कोकण विकासासाठी प्रकल्प व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच आधी पुनर्वसन मग, भूमिपूजन असा आग्रह धरला.  

आजी-माजी सरंपच, ग्रामस्थांशी झालेली चर्चा आणि पानिपतच्या परिसराची पाहणी केल्यानंतर इंडीयन ऑईल कंपनी किंवा पानिपत रिफायनरी प्रकल्पासारख्या प्रकल्पांनी त्या गावांचा, परिसराचा सर्वांगीण विकास झाल्याचे निदर्शनास आले. प्रदूषण नियंत्रणासाठी कंपनीने राबविलेली यंत्रणा, पाण्यावर प्रक्रिया आणि पूनर्वापर, गॅस सोलर, ग्रीडमधून वीज उपलब्धतता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी उत्तम आहे, असे नीलेश पाटणकर यानी सांगितले. अविनाश महाजन म्हणाले, रिफायनरीमुळे कोकणचा विकास होईल, असे वाटते.

प्रकल्पामुळे निर्माण होणारे संभाव्य प्रदूषणाचा शेती, बागायती, मच्छीमारीवर प्रतिकूल परिणाम होण्याच्या शंकेचेही निरसन झाले. कोणाच्या मनामध्ये शंका असल्यास त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला भेट देवून आपले मत बनवावे.  पंढरीनाथ आंबेरकर म्हणाले, कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी रिफायनरी प्रकल्प उभारणी होणे गरजेचे आहे. पानिपत रिफायनरी प्रकल्पामुळे तेथील गावांचा विकास झाल्याचे चित्र दिसले. नाणार रिफायनी झाल्यास येथील विकासालाही चालना मिळणार आहे, असे संदीप पांचाळ यानी सांगितले. पानिपत येथे इंडीयन ऑईल कंपनीने शैक्षणिक विकास, कौशल्य विकास उपक्रम, रूग्णालय आदी उपक्रम राबवून येथील विकासाला चालना दिल्याचे तसेच रोजगार निर्मिती झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे नाणार प्रकल्पही कोकणात व्हावा, असे नीलेश वाईम यानी मत व्यक्त केले. सदाशिव तांबडे यानी पूनर्वसन केल्याचे आश्‍वासक चित्र दिसल्याचे सांगितले.  

गावविकासासाठी शासनावर नव्हे, तर इंडियन ऑईलसारख्या कंपनीवर एखादा सरपंच विसंबून राहू शकतो, हे आश्‍वासक चित्र पानिपतमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे नाणार रिफायनरी व्हावा. 
- सुहास मराठे

रिफायनरीमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलेल...
रिफायनरीमुळे प्रदूषण होणार, असे ऐकले होते. मात्र, प्रदूषण जाणवले नाही. शिवाय ग्रामस्थांच्या राहणीमान सुधारणा झाली आहे. नाणार रिफायनरी झाल्यास आपल्याही गावाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, असा विश्‍वास यास्मिन मणचेकर यानी व्यक्त केला.

Web Title: Rehabilitation before refinery inauguration