Konkan News : धार्मिकस्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार; नीलेश राणेंनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट

कुडाळ तालुक्यातील (Kudal Taluka) देवस्थानांच्या परिसरांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे.
Kudal Nilesh Rane
Kudal Nilesh Raneesakal
Summary

कुडाळ तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थान परिसरांच्या विकासासाठी भाजप नेते राणे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा केली.

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील (Kudal Taluka) देवस्थानांच्या परिसरांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी भाजप नेते नीलेश राणे (Nilesh Rane) प्रयत्नशील असून प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पर्यटन सचिवांनी दिले आहेत.

धार्मिक अधिष्ठान (Religious Place) लाभलेल्या कुडाळ तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थान परिसरांच्या विकासासाठी भाजप नेते राणे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा केली. या देवस्थान परिसराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी त्यांनी केली होती.

त्यावर प्रादेशिक पर्यटन संचलनालयाच्या माध्यमातून देवस्थान परिसराचा विकास आराखडा बनवून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक पर्यटन संचलनालयाकडून दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा विकास होणार आहे.

Kudal Nilesh Rane
Nanded : संतोष बांगरांचं आगमन होताच लग्नातही घुमल्या 'पन्नास खोके एकदम ओके'च्या घोषणा, ठाकरे गट पुन्हा आक्रमक

पहिल्या टप्प्यात या मंदिरांचा विकास

श्री देव कुडाळेश्वर मंदिर (कुडाळ), श्री देव रवळनाथ मंदिर (ओरोस बुद्रुक), श्री सिद्ध महादेव मंदिर (केरवडे कर्याद नारुर), श्री लिंग रवळनाथ मंदिर (पोखरण), देवी भगवती मंदिर (आंब्रड), श्री देव गिरोबा मंदिर (भडगाव), श्री देवी भराडी मंदिर (वाडीवरवडे), श्री देवी भावई मंदिर (गोठोस), श्री देव जटाशंकर मंदिर (नेरुर कर्याद नारुर), श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर (वालावल), श्री देव स्वयंभू महादेव मंदिर (पांग्रड), श्री देव कलेश्वर मंदिर (नेरुर) आदी मंदिर परिसराचा विकास पहिल्या टप्प्यात होणार आहे.

Kudal Nilesh Rane
Konkan News : कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा; पाच वर्षे झाली तरी 'सायक्लॉन सेंटर'ला मुहूर्त काही मिळेना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com