बैलगाडी शर्यतीसाठी अध्यादेश काढा - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अलिबाग - राज्य सरकारने निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन त्वरित बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी अध्यादेश काढावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

केंद्रीय अर्थसंकल्पासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर बैलगाडी शर्यतीसाठी राज्य सराकारने निवडणूक आयोगाची परवानगी मिळवावी, अशी मागणी त्यांनी केली. रायगड जिल्ह्यात, तसेच राज्यात इतरत्र बैलगाडी शर्यती हा परंपरागत खेळ आहे. तमिळनाडूमध्ये जलिकट्टूसाठी आंदोलन झाले. त्याप्रमाणे बैलगाडी शर्यतीसाठी रायगड जिल्ह्यात आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. सरकारला बैलगाडी शर्यतीचे महत्त्व समजले पाहिजे; मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला. चार वर्षांपूर्वी बैलगाडी शर्यतीबाबत सरकारने शेतकऱ्यांची बाजू मांडली. त्यानंतर बैलगाडी शर्यत सुरू झाली; मात्र काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन बंदी आणली. न्यायालयात बाजू मांडण्यास केंद्र व राज्य सरकार कमी पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Remove the bullock race Ordinance