रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सयुंक्त जयंत्ती महोत्सव उत्साहात साजरा

अमित गवळे
शुक्रवार, 8 जून 2018

पाली (रायगड) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या विद्यमाने तथागत गौतम बुध्द, छ. शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, राजश्री छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचा संयुक्त जयंत्ती महोत्सव 2018 नुकताच पालीत साजरा करण्यात आला.

पाली (रायगड) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या विद्यमाने तथागत गौतम बुध्द, छ. शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, राजश्री छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचा संयुक्त जयंत्ती महोत्सव 2018 नुकताच पालीत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून रि.पा.इं कोकण प्रदेश नेते सिध्दार्थ कासारे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक रथाची दोन चाके पहिले धम्मकारण व दुसरे राजकारण अशी होती. बौध्दांचे केवळ बाह्यस्वरुपाचे परिवर्तन होऊन चालणार नाही तर आंतरीक परिवर्तन झाल्याशिवाय आम्ही बौध्द झालो असे म्हणता येणार नाही. बौध्दांचा स्वतंत्र कायदा होणे काळाची गरज यासाठी यासाठी व्यापक स्वरुपाचा लढा उभारला जात असून या राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी आता सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन सिद्धार्थ कासारे यांनी केले.

प्रमुख वक्ते सिध्दार्थ कासारे यांच्यासह  प्रभाकर भा. गायकवाड यांनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.पी.आय रायगड जिल्हा सचिव सुरेश वाघमारे, रि.पा.इं. सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, स्वागताध्यक्ष रविंद्रनाथ ओव्हाळ, आर.पी.आय सुधागड तालुका कार्याध्यक्षा भगवान शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश जी. गायकवाड यांनी केले. व आभार आर.पी.आय जिल्हा संघटक दिलीप जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास रि.पा.इं कोकण प्रदेश नेते सिध्दार्थ कासारे, रि.पा.इं मुंबई प्रदेश नेते सिध्दार्थ कासारे, रि.पा.इं. रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, रि.पा.इं रायगड जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रि.पा.इं जिल्हा सरचिटणीस सुरेश वाघमारे, धम्मप्रचारक प्रभाकर गायकवाड, दिपक पवार, दिलीप जाधव, रि.पा.इं जिल्हा उपाध्यक्ष केशव हाटे, महाड तालुकाध्यक्ष मोहन खांबे, सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे, रोहा तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, रविंद्रनाथ ओव्हाळ, रि.पा.इं सुधागड कार्याध्यक्ष भगवान शिंदे, रि.पा.इं सुधागड युवक अध्यक्ष अमित गायकवाड आदिंसह रि.पा.इं पदाधिकारी, कार्यकर्ते, भिम अनुयायी उपस्थीत होते.

यावेळी प्रबोधनपर कार्यक्रमात ख्यातनाम गायिका निशा भगत व ख्यातनाम गायक राजु बागूल यांच्यात कव्वालीचा सामना पार पडला. या कार्यक्रमात दरम्यान बाळ भिमराव चित्रपटातील बालकलाकाराचा रि.पा.इं जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Web Title: republican party of india celebrates sanyukt jayanti mahotsav