करवंदे, जांभळे व फणसाच्या जातींवर संशोधन

राजेंद्र बाईत
बुधवार, 3 मे 2017

३० गावांमध्ये प्रकल्प - जनुकीय अभ्यासाद्वारे आराखडा बनविणार

राजापूर - वाढती जंगलतोड आणि वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे करवंदे, जांभळे असा कोकणमेवा कमी होत चालला आहे. कोकणात आढळणाऱ्या करंवदे, जांभळे यांच्यासह फणसाच्या विविध प्रजातींवर संशोधन केले जात आहे. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३० गावांची निवड करण्यात आली आहे. 

गावठी वाणांच्या साह्याने संकरित प्रजाती बनवण्यात येणार आहेत. पर्यावरण विभागाच्या पर्यावरण सेवा योजना विभागातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राने दीड वर्षापूर्वी पश्‍चिम घाट विशेष क्‍लब योजनेच्या माध्यमातून जंगलांचे संशोधन केले होते. त्यामध्ये आंब्याच्या २०५, फणसाच्या १९, जांभळाच्या २१, करवंदाच्या पंचवीस जाती आढळल्या होत्या. त्याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस गावांमध्ये सध्या करवंद, जांभूळ आणि फणसाच्या प्रजातींचे संशोधन करून त्यांचे सवर्धन करण्याचा उपक्रम पर्यावरण विभागाने हाती घेतला आहे. 
यामध्ये जीपीएसच्या साह्याने निश्‍चित केलेल्या झाडाचे वय, उंची, बिया, रंग, स्वाद आदींचा जनुकीयदृष्ट्या अभ्यास करून त्याच्या साह्याने आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक फळाच्या विविध प्रजातींचा शोध घेऊन त्यानुसार बिया गोळा केल्या जाणार आहेत.

संशोधनासाठी निवडण्यात आलेली गावे
कणकवली तालुका (जि. सिंधुदुर्ग) : चिंचवली, खारेपाटण, साळिस्ते, वारगाव, मांडवकरवाडी, धावडेवाडी, सौरपवाडी, नरवाडी, चुंबकवाडी, गावठणवाडी, कुरंगवणे, वायंगणी, बिडवणे, कुळकवणे, नडगिवे.
देवगड तालुका (जि. सिंधुदुर्ग) : शेर्पे, धालवली, पोंभुर्ले, कोर्ले, मालपे. 
वैभववाडी तालुका (जि. सिंधुदुर्ग) :  तिथवली, नानिवडे.
राजापूर तालुका (जि. रत्नागिरी) : केळवली (शेंगाळेवाडी), कोंडोशी, निखरे, ठोसरवाडी, तळगाव, वाल्ये, प्रिंदावण, कोंड्ये, मोरोशी, बांदिवडे, सोलगाव, देवाचेगोठणे, शिवणे खुर्द, अणसुरे, ससाळे, ओणी, दत्तवाडी, कुंभवडे.

नष्ट होत चाललेल्या वनसंपदेचे संशोधन होऊन त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून जांभूळ, करवंदे आणि फणसावर सध्या संशोधन सुरू आहे. यामध्ये विविध प्रजातींच्या बिया संकलित करून त्या रुजवण्यात येतील. त्यांची रोपे ग्रामस्थांना मोफत देण्यात येणार आहेत.  
- दिनेश वाघमारे, प्रकल्पाधिकारी

Web Title: research on karvande, jambhalas and junglee breeds