भरती प्रक्रियेत राखीव कोटा द्या ; माजी आमदार तेलींची मागणी

Reserved quota should be given in the recruitment process says Former MLA Rajan Teli
Reserved quota should be given in the recruitment process says Former MLA Rajan Teli

सावंतवाडी : राज्य सरकारकडून नव्याने करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रत्येक जिल्ह्यातील 50% बेरोजगारांना राखीव कोटा ठेवण्यात यावा जेणेकरून स्थानिकांवर अन्याय होणार नाही, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली.

कोकणच्या पर्यटनाला चालना देणा-या 'ब्रेक वॉटर हार्बर' या प्रकल्पाला वेंगुर्लातील निवती समुद्र किनाऱ्यावर तत्त्वता मंजुरी देण्यात आली आहे. अंदाजे १०० कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आहेत. त्याचा फायदा मच्छीमारांसह पर्यटनासाठी होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

याबाबतची माहिती तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दादू कविटकर संजू शिरोडकर उपस्थित होते. तेली म्हणाले, राज्य शासनाकडून येणाऱ्या मोठी भरतीप्रक्रिया देण्याचा निर्णय झाला. मात्र, ही भरती प्रक्रिया त्यात 50 टक्के राखीव कोटा स्थानिक बेरोजगारांना ठेवण्यात यावा. स्थानिकांची त्याठिकाणी यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे.

ते पुढे म्हणाले, निवृत्ती येथे बॅक वॉटर हार्बर हा प्रकल्प राबविण्यासाठी तत्त्वतः आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निवती येथील काम पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यानंतर शिरोडा वेंगुर्ला या दोन किनाऱ्यावर काम करण्यात येणार आहे, असे तेली यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रातील गाळ काढण्यात येणार आहे आणि लाटांची गती मंदावणार आहे. परिणामी समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळी परिस्थितीत तात्काळ बोटी नांगरण्याबरोबरच पर्यटकांच्या क्रूझ बोटी या ठिकाणी थांबू शकतात. त्यामुळे आपोआपच पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे, असे तेली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com