भ्रष्टाचार सिद्ध केल्यास राजीनामा - संजय कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

रत्नागिरी - पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेले आरोप राजकारणातून आहेत. जलयुक्‍त शिवारमधील भ्रष्टाचाराला मी जबाबदार असल्याचे अंशतः जरी सिद्ध झाले, तर मी आमदारीकाचा राजीनामा देईन; मात्र मेडिकल कॉलेजसाठी हडप केलेली जमीन त्या सामान्य शेतकऱ्याची असल्याचे सिद्ध झाले, तर रामदास कदम यांनी राजकीय कारकिर्दीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी दिले.रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात श्री. कदम यांनी आज (ता. २२) पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, ‘‘जलयुक्‍त शिवारमधील गावे शासनाकडून निवडली होती. तेथील कामे देण्यामागे किंवा ती काम करवून घेण्याची जबाबदारी माझी नाही. शासनाच्या नियमानुसार कृषी विभागाकडून कामांचे वाटप झाले आहे. ती कामे निकृष्ट झाली असतील, तर त्याची त्रयस्थांमार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे केली आहे. खेड, मंडणगड, दापोली मतदारसंघातील सर्व कामांची तपासणी झाली पाहिजे. याला जे उपविभागीय अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्याकडे चौकशीचे काम दिले गेले आहे. याचाही विचार करावा, अशी सूचना केली आहे. यापूर्वी पाणलोटमधील निकृष्ट कामांच्या प्रश्‍नावर मी आवाज उठविला होता.

दंत महाविद्यालयाच्या जमिनीवरुन सुरू असलेला वाद, स्वीय सहाय्यकाने मागितलेली लाच प्रकरणामुळे रामदास कदम व्यथित झाले आहेत. तिकडील लक्ष विचलित करण्यासाठी कदम यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर जलयुक्‍त शिवारच्या माध्यमातून प्रत्यक्ष सरकारच्या कामावरच शंका उपस्थित केली आहे.’’ चुकीची माहिती सादर करून बदनामी करणाऱ्या रामदास कदम यांचे मंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे आमदारकदम यांनी सांगितले. ते म्हणाले , ‘‘जलयुक्‍तची कामे एकाच मतदारसंघात निकृष्ट झाल्याचे दाखविले जात आहे. तसे असेल तर सर्वच मतदारसंघातील आमदारांच्या कामांची चौकशी लावली जावी, अशी माझी मागणी आहे. रामदास कदमांची वक्‍तव्य ही फक्‍त राजकीय प्रेरीत आहेत. त्यांच्या मजूर संस्था आहेत. गावात केलेल्या कामांसाठी मजूर कोणते वापरले, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. जेणेकरुन मजूर संस्थांचा वापर कशासाठी केला जातो हे बाहेर पडेल. 

निळवणेतील काम निकृष्ट दर्जाचे
खेड-दापोलीतील वणौशी, निळवणेतील कामे मी पाहिली. त्यातील निळवणेतील वणौशीचे काम निकृष्ट आहे. ते काम करणाऱ्या ठेकेदारासह मार्गदर्शन करणाऱ्या कृषी सहायकाची चौकशी लावली आहे. तसेच जलयुक्‍तमधील चौदाशे कामांची तपासणी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री. जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Resignation After Proven Corruption - Sanjay Kadam