जठारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फाडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

चिपी (ता. वेंगुर्ले) - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला. तुम्हाला अपेक्षीत रोजगार अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

चिपी (ता. वेंगुर्ले) - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला. तुम्हाला अपेक्षीत रोजगार अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर श्री. जठार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ रोजगाराच्या मुद्द्यावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. या पार्श्‍वभूमीवर चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी श्री. फडणवीस आज सिंधुदुर्गात आले होते.

यावेळी जठार यांनी आपला राजीनामा त्यांना सादर केला. रोजगाराच्या मुद्यावर राजीनामा देत असल्याचे त्यांनी यात म्हटले होते. श्री. फडणवीस यांनी तातडीने हा राजीनामा फाडून टाकला. युतीसरकार विविध प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पातून जितक्या रोजगाराचे आश्‍वासन दिले. तितका या नव्या प्रकल्पांमधून उपलब्ध होईल. तुम्ही काळजी करू नका. अशी ग्वाही फडणवीस यांनी त्यांना दिली. 

जठारांचा राजीनामा तेलींच्या खिशात
श्री. जठार यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फाडला. यावेळी बाजूला माजी आमदार राजन तेली होते. त्यांनी हा फाडलेला राजीनामा तेलींच्या हातात दिला. त्यांनी तो खिशात घातला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resignation of Pramod Jathar torn by Chief Minister