कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटरांचे सामुहीक राजीनामे 

कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटरांचे सामुहीक राजीनामे 

सिंधुदुर्गनगरी - कुडाळ तालुक्‍यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या केंद्र चालक अर्थात डाटा ऑपरेटरना चार महिने मानधनच मिळाले नसल्याने त्यांनी सामुहीक राजीनामे दिले आहेत. मानधन वितरणातील अनियमिततेला कंटाळून हा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम होणार आहे. 

गेली 8 वर्षे त्यांना मानधनासाठी चार-चार महीने प्रतिक्षा करावी लागत आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या कामाबरोबरच ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांची मर्जी सांभाळण्यासाठीही अतिरीक्‍त काम करावे लागत आहे. या कामाचा त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही.

ग्रामपंचायतींकडून आपले सरकार सेवा केंद्रासाठी 1 वर्ष आगावू रक्‍कम (1 लाख 44 हजार) प्रत्येक ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद घेते. तरीही केंद्र चालकांचे मानधन मात्र 4-5 महीने होत नाही.

संबंधीत ठेकेदार कंपनीकडे विचारणा केली असता जिल्हा परिषद वेळेत कंपनीला पैसे वर्ग करत नसल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनियमित कारभाराचा फटका सर्वसामान्य गरीब बेरोजगार केंद्रचालक उमेदवारांना बसत आहे. अनियमित मानधन व कामाचा वाढता दबाव यामुळे कंटाळलेल्या कुडाळ तालुक्‍यातील केंद्र चालकांनी तालुका समन्वयक राकेश तिरोडकर यांच्याकडे सामुहीक राजीनामे दिले. 

ठेकेदार कंपनीकडून हिशोब नाही 
ग्रामपंचायत संघटनेकडून संबंधीत आपले सरकार सेवा केंद्र चालविणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून मागील वर्षभराचा खर्चाचा हिशोब मागितला आहे; मात्र संबंधीत कंपनीने अद्याप दिलेला नसल्याने तसेच वर्षभरापूर्वी जिल्हापरिषदेकडे प्रत्येक ग्रामपंचायतीकडून लाखो रूपये रक्‍कम वर्ग करूनही ग्रामपंचायतमध्ये कार्यरत केंद्रचालकांना मानधन दिले जात नसेल तर यापुढे कोणतीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेकडे आपले सरकार सेवा केंद्राचा निधी वर्ग करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे केंद्र चालकांना मानधन मिळणे कठीण बनले आहे. 

ग्रामपंचायतीचे काम होणार ठप्प 
शासनाच्या विविध योजनांची कामे आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून चालते; मात्र तेथे कार्यरत असलेल्या केंद्रचालक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्याने आता ग्रामपंचायतीची सर्वच योजनांची कामे ठप्प होणार आहेत. सरपंच संघटनांकडून केंद्रचालकांचे मानधन वेळेत व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com