सावंतवाडीत अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव 

सावंतवाडीत अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव 

सावंतवाडी -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत विकासकामाच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांसह विरोध गटाच्या सदस्यांनी एकत्र येत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले. या वेळी काही झाले तरी आचारसंहितेपूर्वी लोकांची कामे पूर्ण करा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या वेळी कृषी अधिकारी प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांना सभागृहात उत्तर देताना आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील नाही, असे विधान केल्यामुळे सभागृहात खळबळ उडाली. तारतम्य न ठेवता अशी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला तर याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करा, अशी मागणी सभागृहाकडून करण्यात आली. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या वेळी होऊ घातलेल्या निवडणुकीत आचारसंहितामुळे विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तालुक्‍यातील पाणलोट प्रकल्पाच्या निधीबाबत झालेल्या चर्चेत कृषी अधिकारी प्रमोद सावंत यांनी सभापतींसह सर्व सदस्यांनी केलेल्या प्रश्नांवर सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी बांधील नाही, असे सांगत सभागृहातून बाहेर पडले. यावर सभागृहात खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधकही आक्रमक झाले. अध्यक्षांचा परवानगी शिवाय अधिकाऱ्याने सभागृहाबाहेर जाणे म्हणजे हे सभागृह चण्याफुटाण्याचे दुकान आहे का? अशा प्रश्न करत कृषी अधिकारी सावंत यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. 

नेमळे ग्रामपंचायतीने वेंगुर्लेकरवाडी नळयोजनेसाठी निधी खर्च घातला; मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी नळयोजनेचे काम झाले नसल्याचा खुलासा सदस्या वर्षा हरमलकर यांनी केला. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. दरम्यान, आपण याबाबत माहिती घेतो असे उत्तर देत अधिकाऱ्याने वेळ मारून नेली. पंचायत समिती सेस अनुदान खर्च घालण्यासाठी लाभार्थी निवड करा, अशी करण्यात आली; मात्र संबंधित लाभार्थ्याने प्रथम स्वखर्चाने वस्तू खरेदी करण्याचा नविन अध्यादेश जारी केल्याचे सांगण्यात आल्याने माजी सभापती प्रियांका गावडे यांनी याला आक्षेप घेतला. स्वतःच्या खर्चातून वस्तू खरेदी करण्याइतका लाभार्थी आर्थिक सक्षम नसतो. त्यामुळे यात बदल आवश्‍यक आहे, अशी मागणी केली. त्याला सदस्य विनायक दळवी यांनी साथ दिली. या अध्यादेशाबाबत आपण जिल्हा स्थरावर परिपूर्ण माहिती घेतो त्यानंतर यावर चर्चा व्हावे, अशी विनंती केली. 

विलवडे गावात 2008 साली जिल्हा ग्रामीण विकास योजने अंतर्गत काही लाभार्थ्यांनी कोकम प्रकल्पासाठी जमीन बक्षीसपत्र करून प्रस्ताव सादर केला; मात्र आज आठ वर्ष होऊनही त्याबाबत काहीच उत्तर लाभार्थीना मिळाले नाही. हे जमीन बक्षीसपत्र रद्द करावे, याबाबत पाठपुरावा केला; मात्र काहीच हालचाल नसल्याने संबंधित अधिकाऱ्याला सदस्य विनायक दळवी यांनी धारेवर धरले. याबाबत आपण वरिष्ठाकडे चौकशी करतो असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

अपूर्ण कामाबाबत अधिकारी धारेवर 
कारिवडे, कोलगाव येथिल शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी पैसे भरूनही त्यांना अद्याप कनेक्‍शन मिळत नाही. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी उपसभापती महेश सारंग यांनी संबधित अधिकाऱ्यांजवळ केली. जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर रस्ताच्या अपूर्ण कामाबाबत सदस्य अशोक दळवी यांनी संबंधितांना धारेवर धरले.  या बैठकीला सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com