उजाड डोंगरावर तब्बल 512 झाडे लावण्याचा तरुणाचा संकल्प

अमित गवळे
रविवार, 16 जून 2019

पाली : फार वर्षांपूर्वी वृक्षांनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट वावे गावातील तरुणांना बैचेन करत होती. मग सर्व तरुणांनी संकल्प केला की, गावासमोरील उजाडलेलं जंगल पुन्हा एकदा बहरून टाकूयात!

पाली : फार वर्षांपूर्वी वृक्षांनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट वावे गावातील तरुणांना बैचेन करत होती. मग सर्व तरुणांनी संकल्प केला की, गावासमोरील उजाडलेलं जंगल पुन्हा एकदा बहरून टाकूयात!

तरुणांसह गावातील ग्रामस्थांनी त्या डोंगरावर शास्त्रशुद्ध पद्धतीने 512 झाडे लावण्याचे योजले आहे.या मोहिमेतील पहिला टप्पा रविवारी (ता.9) पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात 238 खड्डे खणून ठेवले आहेत. अजून 326 खड्डे खणणे बाकी होते. ते काम सुद्धा रविवारी (ता.16) पूर्ण झाले. एकूण 512 खड्डे खोडण्याचे काम पूर्णत्वास आले असून पाऊस पडल्यानंतर यामध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल.

खड्डे किती रुंद व खोल असावेत, त्यांच्यातील अंतर किती असावे. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यानंतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत यासाठी वनविभागाकडून सर्व शास्त्रशुद्ध माहिती घेतली जात आहे. या अभियानास वनविभागाचे मार्गदर्शन व सहकार्य आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 512 खड्यांत रोपे लागवड करण्यात येतील. नुसते रोपे लावून न थांबता ती जगविण्यावर अधिक भर देऊन त्यांचे योग्य संगोपन करण्यात येणार आहे. या मेहनतीचे संपूर्ण श्रेय वावे गावातील तरुणांचं आहे आहे असे गावातील तरुण व भैरवनाथ क्रिडामंडळाने सकाळला संगितले. 

गावातील तरुणांसोबतच लहानगे देखील हातात फावडे व कुदळ घेऊन या मोहिमेत श्रमदान करत आहेत. पर्यावरण संवर्धन व त्यासाठी सुरू केलेल्या वृक्षलागवड मोहिमेसाठी सारेच जण भारावून गेले आहेत.

सोशलमिडीयाच्या माध्यमातून हे तरुण मोहिमेचे व्हिडीओ व फोटो अपलोड करत आहेत. तसेच सगळ्यांना आपल्या या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या कामाने प्रेरित होऊन इतर ठिकाणी देखील अशा स्वरूपाच्या मोहीमा सुरू करण्याचे ठरविले जात आहेत. अशा स्वरूपाची मोहीम संपूर्ण तालुकाभर राबविण्याचे आवाहन शिवऋण प्रतिष्ठानने केले आहे. त्याच प्रमाणे वावे गावातील सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन तालुक्यात सर्वप्रथम वृक्ष लागवडी करिता सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून शासनाच्या वृक्ष लागवड अभियानास देखील मोठे सहकार्य मिळणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The resolution of the youth to plant 512 trees on the Mountain